कोणत्या जिल्ह्याचे कोण बनले पालकमंत्री ?
Maharashtra Guardian Ministers List
Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र - राज्य विधानमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था
सरळसेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्रात, जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
(सरळसेवा, महाराष्ट्र जिल्हा परिषद 2014)
1. जिल्हाधिकारी
2. जिल्ह्याचे पालकमंत्री
3. जिल्हा नियोजन अधिकारी
4. मुख्य कार्यकारी अधिकारी
उत्तर : जिल्ह्याचे पालकमंत्री
बातमी काय आहे ?
महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे.
पालकमंत्री म्हणजे काय ?
• पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक म्हणून काम पाहतात.
• राज्य सरकारद्वारे राज्यातील विशिष्ट जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जाते.
• पालकमंत्री जिल्ह्यातील विविध राज्य सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतात आणि जिल्ह्याचे प्रशासन कार्यक्षमतेने कार्यरत असल्याची खात्री करतात.
पालकमंत्रिपद इतके महत्त्वाचे का असतं ?
• जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेनं कार्यरत आहे ना, तसेच जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच असतं.
• लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्त्वाचं धागा म्हणूनही पालकमंत्रिपदाकडे पाहिलं जातं.
• त्या जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो किंवा लोकोपयोगी कोणतेही काम असो, किंवा अगदी शासकीय समारंभ असोत, पालकमंत्री या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असतो.
• मोठमोठ्या योजनांसाठी जमीन अधिग्रहण करणे, एक्सप्रेस वे, विमानतळ, रेल्वे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर विविध योजनांमध्ये जिल्हा नियोजन समिती आणि या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पालकमंत्री यांची मोठी भूमिका असते.
• जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा मोठा प्रभाव असतो.
महाराष्ट्रात, जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
• महाराष्ट्रात, जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतात.
• महाराष्ट्र जिल्हा नियोजन समित्या अधिनियम, 1998 आणि त्यातील नियमांनुसार, जिल्ह्याचे पालकमंत्री यांची महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन केले जाते.
जिल्हा नियोजन समिती (District Planning Committee) म्हणजे काय ?
जिल्हा नियोजन समितीची स्थापना कोण करतं ?
• जिल्हा नियोजन समिती ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ZD नुसार जिल्हा स्तरावर जिल्हा आणि त्याखालील नियोजनासाठी तयार केलेली समिती आहे.
• जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, नगर पंचायत, नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांनी तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करण्यासाठी आणि जिल्ह्यासाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी शासन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती स्थापन करते.
1. गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (सहपालकमंत्री - ॲड. आशिष जयस्वाल)
2. मुंबई शहर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
3. ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
4. पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार
5. बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार
6. नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे
8. अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील
9. वाशीम : हसन मुश्रीफ
10. सांगली : चंद्रकांत पाटील
11. नाशिक : गिरीश महाजन (नियुक्ती स्थगित)
12. पालघर : गणेश नाईक
13. जळगाव : गुलाबराव पाटील
14. यवतमाळ : संजय राठोड
15. मुंबई उपनगर : ॲड.आशिष शेलार ( सहपालकमंत्री- मंगलप्रभात लोढा)
16. रत्नागिरी : उदय सामंत
17. धुळे : जयकुमार रावल
18. जालना : श्रीमती पंकजा मुंडे
19. नांदेड : अतुल सावे
20. चंद्रपूर : डॉ.अशोक उईके
21. सातारा : शंभूराज देसाई
22. रायगड : कु.आदिती तटकरे (नियुक्ती स्थगित)
23. लातूर : शिवेंद्रसिंह भोसले
24. नंदुरबार : ॲड.माणिकराव कोकाटे
25. सोलापूर : जयकुमार गोरे
26. हिंगोली : नरहरी झिरवाळ
27. भंडारा : संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट
29. धाराशिव : प्रताप सरनाईक
30. बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील)
31. सिंधुदुर्ग : नितेश राणे
32. अकोला : आकाश फुंडकर
33. गोंदिया : बाबासाहेब पाटील
34. कोल्हापूर : प्रकाश आबिटकर (सहपालकमंत्री- श्रीमती माधुरी मिसाळ)
35. वर्धा : डॉ.पंकज भोयर आणि
36. परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर