
चालू घडामोडी 24, जानेवारी 2025 | राष्ट्रीय बालिका दिवस | National Girl Child Day

राष्ट्रीय बालिका दिवस
National Girl Child Day
Subject : GS - दिनविशेष, सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो ?
(SSC CGL 2020- 2021)
1. 5 जून
2. 12 मे
3. 24 जानेवारी
4. 9 सप्टेंबर
उत्तर : 24 जानेवारी
राष्ट्रीय बालिका दिनाबद्दल महत्त्वाची माहिती :
• राष्ट्रीय बालिका दिन, भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
• मुलींचे हक्क, शिक्षण आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे.
राष्ट्रीय बालिका दिन साजरी करण्यास केव्हा पासून सुरुवात झाली ?
महिला आणि बाल विकास मंत्रालयाने (Ministry of Women and Child Development) 2008 मध्ये राष्ट्रीय बालिका दिन साजरी करण्यास सुरुवात केली.
आपण राष्ट्रीय बालिका दिन का साजरी करतो ?
राष्ट्रीय बालिका दिन का साजरी करण्याचा उद्देश कोणता ?
• राष्ट्रीय बालिका दिन ही मुलींच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्याची आणि त्यांना लैंगिक भेदांपासून मुक्त समान संधी आणि समर्थन प्रदान केले जाण्याची खात्री करण्याची संधी आहे.
• हा दिवस मुलींना भेडसावणाऱ्या असमानतेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो,
• मुलींबद्दलचा सामाजिक दृष्टिकोन बदलणे,
• स्त्री भ्रूणहत्येसारख्या समस्यांचे निराकरण करणे,
• घटत्या लिंग गुणोत्तराबद्दल जागरुकता निर्माण करणे
• मुलींसाठी अधिक समावेशक आणि न्याय्य वातावरण निर्माण करणे
• मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि समाजाला मुलींना समान मानण्यास आणि त्यांचा आदर करण्यास प्रोत्साहित करतो.
• या दिवसाचा उद्देश मुलींना सशक्त करण्यासाठी जागरुकता वाढवणे आणि लिंगभेदाच्या अडथळ्यांशिवाय वाढू शकेल असे वातावरण निर्माण करणे हा आहे.
राष्ट्रीय बालिका दिन 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
" उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम बनवणे " ही राष्ट्रीय बालिका दिन 2025 ची संकल्पना (थीम) आहे.
"Empowering Girls for a Bright Future"
मुलींसाठी सरकारी योजना कोणत्या ?

• त्याचबरोबर महिला वसतिगृहे, मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय योजना यांसारख्या अनेक योजना सरकार राबवत आहेत.
नोट :
24 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) म्हणून साजरी करतात.
11 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिन (International Day of the Girl) म्हणून साजरी करतात.