
चालू घडामोडी 25, जानेवारी 2025 | 15 वा राष्ट्रीय मतदार दिन 2025 | 15th National Voters' Day 2025

15 वा राष्ट्रीय मतदार दिन 2025
15th National Voters' Day 2025
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र - निवडणूक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
1) 25 जानेवारी
2) 26 जानेवारी
3) 15 ऑगस्ट
4) 26 नोव्हेंबर
उत्तर : 25 जानेवारी
बातमी काय आहे ?
• 15 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त आज, 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
• भारतीय निवडणूक आयोग यंदा आपल्या समर्पित राष्ट्रसेवेची 75 वर्षे साजरी करत आहे.
• निवडणूक आयोगाच्या "इंडिया व्होट्स 2024: सागा ऑफ डेमॉक्रसी" या कॉफी टेबल पुस्तकाची पहिली प्रत मुख्य निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार यांच्या हस्ते माननीय राष्ट्रपतींना देण्यात आली.

राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारीलाच का साजरी केला जातो ?
• 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची ( Election Commission of India ) स्थापना करण्यात आली.
• भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनाचे महत्त्व लक्षात घेता 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदाता दिन म्हणून साजरा केला जातो.
पहिला राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• 25 जानेवारी 2011 रोजी सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला गेला.
• तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला.
राष्ट्रीय मतदार दिन का साजरा केला जातो ?
राष्ट्रीय मतदार दिन साजरी करण्याचा उद्देश काय आहे ?
• लोकशाही मतदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.
• नवीन मतदारांना मतदान यादीत नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यासाठी सुविधा देणे तसेच जास्तीत जास्त नाव नोंदणी करून लोकांना त्यांच्या अधिकाराबाबत जागृत करणे हा राष्ट्रीय मतदार दिनाचा मुख्य उद्देश आहे.
• भारतात 18 वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे.
• धर्म,जात, लिंग, वर्ण, संप्रदाय या निकषांवर भेदभाव न करता कोणताही व्यक्ती मतदानाचा अधिकार बजावू शकतो.
• भारताचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ही बाब महत्त्वपूर्ण आहे.
राष्ट्रीय मतदार दिन 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
• या वर्षीची संकल्पना, "मतदानाइतके महत्वाचे काहीही नाही, मी मतदान करतोच" (Nothing Like Voting, I Vote for Sure) ही आहे.
• ही संकल्पना निवडणूक प्रक्रियेतील मतदारांच्या सहभागाच्या महत्त्वावर जोर देते आणि मतदारांना त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्यात अभिमान बाळगण्यास प्रोत्साहित करते.
भारतीय निवडणूक आयोगा संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
Election Commission of India (ECI)
भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
• 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
• सचिवालय : भारतीय निवडणूक आयोगाचे सचिवालय नवी दिल्ली येथे आहे.
राज्यघटनेत कलम 324 ते 329 कशाशी संबंधित आहे ?
• भारतीय संविधानाचा भाग XV निवडणुकांची संबंधित आहे.
• राज्यघटनेतील कलम 324 ते 329 भारतीय निवडणूक आयोग आणि सदस्य यांची पात्रता, अधिकार, कार्यकाळ, कार्य इत्यादींशी संबंधित आहे.
भारतीय निवडणूक आयोगाची रचना, शपथ, कार्यकाळ :
‣ भारतीय निवडणूक आयोगामध्ये एक प्रमुख निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात.
‣ नियुक्ती : त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.
‣ कालावधी : त्यांचा कार्यालयीन कालावधी 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयापर्यंत, यांपैकी जे आधी असेल ते निश्चित आहे.
‣ दर्जा, पगार आणि भत्ते : त्यांचा दर्जा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समान असतो. आणि त्याप्रमाणेच पगार व भत्ते त्यांना असतात.
‣ संविधानाच्या कलम 324 अनुसार भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुकांची देखरेख, दिशा आणि नियंत्रण याचे अधिकार भारतीय निवडणूक आयोगाकडे असतील.
भारताचे वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) कोण आहे ?
श्री राजीव कुमार हे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे.