
चालू घडामोडी 27, जानेवारी 2025 | 76वा प्रजासत्ताक दिन | Republic Day

76वा प्रजासत्ताक दिन
76th Republic Day
🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 26 जानेवारी 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे कोण होते ?
(सरळसेवा, पोलीस भरती, SSC GD 2019, SSC CHSL 2021,2023, SSC CPO 2024,.....)
1. डोनाल्ड ट्रम्प
2. प्रबोवो सुबियांतो
3. शिंजो आबे
4. इमॅन्युएल मॅक्रॉन
उत्तर : प्रबोवो सुबियांतो
भारताने आपला 76 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहाने साजरा केला.
प्रजासत्ताक दिन 2025 ची थीम ( संकल्पना ) काय आहे ?
यंदाची प्रजासत्ताक दिनाची थीम 'स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास' (Swarnim Bharat: Virasat aur Vikas) ही आहे.
76 व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहे ?
2025 च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो (Mr Prabowo Subianto) हे आहे.

'भारत पर्व' कार्यक्रम
पर्यटन मंत्रालयाकडून 26 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्यावर 'भारत पर्व' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल.
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास
• भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 द्वारे भारत स्वतंत्र झाला परंतु भारत एक घटनात्मक राजेशाही बनले. यात जॉर्ज सहावा राज्य प्रमुख आणि लॉर्ड माऊंटबॅटन गव्हर्नर जनरल बनले.
• भारत राष्ट्राच्या कारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना बनवण्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली.
• डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
• तब्बल 2 वर्षे 11 महिने 17 दिवसांच्या चर्चेनंतर 4 नोव्हेंबर 1947 रोजी संविधानाचा मसुदा संविधान सभेत मांडला गेला.
• 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले ; म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो.
• 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान लागू झाले.
• 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेने, भारत सरकार कायदा,1935 ची जागा घेतली आणि भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उद्यास आले.
26 जानेवारी हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का निवडला गेला ?
• 1929 च्या लाहोर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 26 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून घोषित केला.
• या दिवसाच्या स्मरणार्थ 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला गेला.