
चालू घडामोडी 25, जानेवारी 2025 | राष्ट्रीय पर्यटन दिवस | National Tourism Day

राष्ट्रीय पर्यटन दिवस
National Tourism Day
Subject : GS - दिनविशेष, अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय पर्यटन दिवसा बद्दल खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा
अ) दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जातो.
ब) पर्यटनामुळे रोजगार निर्मिती होते.
पर्याय :
1. फक्त अ बरोबर
2. फक्त ब बरोबर
3. अ आणि ब दोन्ही बरोबर
4. अ आणि ब दोन्ही चूक
उत्तर : अ आणि ब दोन्ही बरोबर
राष्ट्रीय पर्यटन दिवसा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा असतो ?
• दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला जातो.
• याचा उद्देश जबाबदार, शाश्वत आणि सुलभ पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा आहे.
पर्यटन मंत्रालय (Ministry of Tourism) :
• भारताने 1948 मध्ये वारसा जतन करण्यासाठी आणि पर्यटन स्थळे सुधारण्यासाठी पर्यटन विभाग स्थापन केला.
• भारतातील पर्यटन मंत्रालय (Ministry of Tourism) पर्यटनाच्या विकासासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी देशाची राष्ट्रीय धोरणे तयार करण्यासाठी जबाबदार आहे.
• भारतातील पर्यटन मंत्रालय हे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी देखील सहकार्य करते.
भारतात लोक पर्यटन प्रामुख्याने को- कोणत्या कारणासाठी करतात ?
भारतात पर्यटनाचे प्रकार कोणते ?
सांस्कृतिक, निसर्ग, वारसा, शैक्षणिक, व्यवसाय, क्रीडा, ग्रामीण, वैद्यकीय, समुद्रपर्यटन आणि इको-टुरिझम यासारखे पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत.
उदाहरणार्थ :
• सांस्कृतिक : कुंभमेळा, देव - दर्शन इत्यादी.
• क्रीडा : IPL, World Cup साठी बाहेरून देशीतील त्याचबरोबर विदेशातील पर्यटक येतात.
• वारसा : कोणार्क मंदिर, नालंदा विद्यापीठ, ताज महाल यांसारखे भारतात अनेक युनेस्को जागतिक वारसा स्थळे आहेत.
पर्यटनामुळे काय फायदा होतो ?
• भारतात पर्यटन हा एक प्रमुख उद्योग आहे जो आर्थिक वाढ, सांस्कृतिक आदानप्रदान आणि आंतरराष्ट्रीय समज वाढवतो.
• पर्यटन आणि आतिथ्य उद्योग हा भारतातील सर्वात मोठ्या सेवा उद्योगांपैकी एक आहे.
• भारतातील पर्यटन क्षेत्र हे मेक इन इंडिया कार्यक्रमाचा अविभाज्य स्तंभ आहे.
• भारतातील पर्यटन उद्योग रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे.
• जसे की हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स, वाहतूक पायाभूत सुविधा (विमान वाहतूक, रस्ते, शिपिंग आणि रेल्वे) आणि आरोग्य सुविधांसह बहु-वापराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला पर्यटन प्रोत्साहन देते.
• पर्यटन उद्योग महिला कर्मचाऱ्यांच्या सर्वात मोठ्या रोजगार देणाऱ्यांपैकी एक आहे.
2025 साठी राष्ट्रीय पर्यटन दिवसाची संकल्पना (थीम) काय आहे ?
• 2025 ची थीम "समावेशक विकासासाठी पर्यटन " (Tourism for Inclusive Growth) ही आहे.
• यंदाची संकल्पना आर्थिक वाढीसाठी पर्यटनाच्या भूमिकेवर भर देते आणि समाजातील सर्व घटकांना फायदा पोहोचवते.
पर्यटनाला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे :
• राष्ट्रीय पर्यटन धोरण, 2022
• देखो अपना देश कार्यक्रम
• स्वदेश दर्शन योजना
• एक भारत श्रेष्ठ भारत
• ई-व्हिसा सुविधा
• क्रूझ पर्यटन
• मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (महाराष्ट्र राज्य)
भारताचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत ?
श्री गजेंद्रसिंह शेखावत सध्याचे (2025 मध्ये) देशाचे पर्यटन मंत्री आहेत.
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत ?
(महाराष्ट्र पोलीस नागपूर 2021)
श्री शंभूराज देसाई हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे (2025 मध्ये) पर्यटन मंत्री आहेत