
चालू घडामोडी 28, जानेवारी 2025 | लाला लजपतराय | Lala Lajpat Rai

लाला लजपतराय जयंती
Birth Anniversary of Lala Lajpat Rai
पंजाब केसरी लाला लजपतराय यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती, आधुनिक भारताचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ------ यांनी मॅझिनी, गॅरिबाल्डी, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण यांची चरित्रे लिहिली; काही काळ अमेरिकेत राहिले; आणि सेंट्रल असेंब्लीसाठी निवडूनही आले.
(UPSC 2018)
1. अरबिंदो घोष
2. बिपिन चंद्र पाल
3. लाला लजपत राय
4. मोतीलाल नेहरू
उत्तर : लाला लजपत राय
जन्म आणि शिक्षण :
• लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके या गावी झाला.
• लाला लजपतरायांनी मिशन हायस्कूलमधून शिक्षण घेऊन पुढे एल्एल्. बी. ही पदवी मिळविली आणि अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाली.
• लाहोरमध्ये शिकत असताना ते स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हिंदू सुधारणावादी चळवळीमुळे प्रभावित झाले आणि लाला लजपत राय आर्य समाजाचे सदस्य बनले.
• लाला लजपतराय यांना पंजाब केसरी, पंजाबचा सिंह असेही म्हणतात.
लाल-बाल-पाल या नावाने कोण प्रसिद्ध आहेत ?
• लाला लजपत राय हे जहाल मतवादी नेते होते.
• लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांना लाल-बाल-पाल म्हणून ओळखले जाते.
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील भूमिका :
• बंगाल फाळणीच्या निषेधार्थ लाला लजपत राय यांनी आंदोलने काढली.
• लाल-बाल-पाल या नावाने प्रसिद्ध असलेल्या या तिघांनी स्वदेशी चळवळीदरम्यान स्वराज्य, स्वदेशी आणि ब्रिटीश वस्तूंवर बहिष्कार टाकला.
• पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे 1907 मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपतराय आणि अजितसिंग यांना अटक करून त्यांची मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली.
• ऑक्टोबर 1917 मध्ये, लाला लजपत राय यांनी न्यूयॉर्कमध्ये इंडियन होम रूल लीग ऑफ अमेरिकाची स्थापना केली, ज्याचा उद्देश भारताच्या स्वराज्यासाठीच्या लढ्याबद्दल जागरूकता पसरवणे हा होता.
• 1920 साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे लाला लजपत राय हे अध्यक्ष होते.
सायमन कमिशनला विरोध आणि लाला लजपतराय यांचा मृत्यू :
• ब्रिटीश सरकारने नोव्हेंबर 1927 मध्ये भारताच्या घटनात्मक प्रगतीचा अहवाल देण्यासाठी आणि पुढील घटनात्मक सुधारणा करण्यासाठी सायमन कमिशनची नियुक्ती केली.
• परंतु या समितीच्या 7 सदस्यांमध्ये एकही भारतीय नव्हता.
• भारतातील लोकांसाठीच्या असलेल्या सुधारणांमध्ये एकही भारतीय नसणे यामुळे हे भारतीयांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचे उल्लंघन आणि भारतीयांच्या स्वाभिमानाचा अपमान होता. त्यामुळे सायमन कमिशनला विरोध घेण्यात आला.
• सायमन कमिशन लाहोरमध्ये आल्याच्या निषेधार्थ "सायमन गो बॅक" असा नारा देत लाला लजपतराय यांनी 30 ऑक्टोबर 1928 रोजी अहिंसक निदर्शनाचे नेतृत्व केले.
• जेम्स ए. स्कॉट, या पोलिस अधीक्षकाने आंदोलकांवर "लाठीचार्ज" करण्याची सूचना केली.
• लाला लजपतराय यांच्या छातीवर वार केले गेले यामुळे 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले.
जे. पी. साँडर्सचा वध :
• पोलिसांच्या लाठीहल्ल्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला.
• त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून 1928 मध्ये (लाहोर कट प्रकरण) पोलिस अधिकारी जे. पी. साँडर्स याला भगतसिंग, राजगुरू आणि आझाद यांनी गोळ्या घालून ठार केले.
लाला लजपत राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले ?
• लाला लजपत राय यांनी लाहोरमधून ‘वंदे मातरम’ हे उर्दू दैनिक सुरू केले.
• लाला लजपत राय यांनी ‘द पीपल’ हे साप्ताहिक काढले.
• लाला लजपत राय यांनी ‘पंजाबी’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
लाला लजपत राय यांचे लिहिलेले साहित्य :
• द स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन (1908)
• आर्य समाज (1915)
• युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका: अ हिंदू इंप्रेशन (1916)
• इंग्लंडचे भारतावरील कर्ज: भारतातील ब्रिटनच्या वित्तीय धोरणाची ऐतिहासिक कथा (1917)
• भारतातील राष्ट्रीय शिक्षणाची समस्या (1920)
• दुखी भारत (1928)
• श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची चरित्रे लिहिली. (UPSC 2018)
प्रमुख संस्था
• त्यांनी पंजाबमध्ये पीपल्स सोसायटीची स्थापना केली.
• पंजाब नॅशनल बँकेच्या स्थापनेत लाला लजपत राय यांचे महत्वाचे योगदान होते.
• लाला लजपत राय यांनी न्यूयॉर्कमध्ये इंडियन होम रूल लीग ऑफ अमेरिकाची स्थापना केली.