
चालू घडामोडी 28, जानेवारी 2025 | आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव | International Pashmina Festival

आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव
International Pashmina Festival
Subject : GS - GI Tag
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जानेवारी 2025 मध्ये खालील पैकी कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित केला ?
1. भारत
2. भूतान
3. नेपाळ
4. पाकिस्तान
उत्तर : नेपाळ
बातमी काय आहे ?
• नेपाळ पश्मिना इंडस्ट्री असोसिएशन आणि कॉन्फेडरेशन ऑफ नेपाळी इंडस्ट्रीज यांनी पहिल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आणि प्रदर्शनाचे आयोजन केले.
• नेपाळी पश्मीनाचे वेगळेपण, गुणवत्ता आणि पारंपारिक हस्तकला जागतिक व्यासपीठावर प्रदर्शित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
• नेपाळ त्याच्या अस्सल पश्मिना उत्पादनांसाठी ओळखला जातो.
• याला "च्यंगरा पश्मिना" असे नाव दिले जाते, जे त्याची उच्च गुणवत्ता आणि मौलिकता दर्शवते.
पश्मिना लोकर एवढं महाग का आहे ?
• मऊपणा, उबदारपणा आणि हाताने बनवलेल्या क्लिष्ट डिझाईन्समुळे याला जगभरात प्रचंड लोकप्रियता आहे.
• पश्मिना शेळीच्या अंडरकोटपासून मिळणारी लोकर जगातील सर्वात नाजूक आणि हलक्या नैसर्गिक तंतूंपैकी एक आहे.
• त्याची जाडी 12-16 मायक्रॉन आहे, जी मानवी केसांपेक्षा पातळ आहे.
• ते सामान्य लोकरपेक्षा आठ पट जास्त उबदार आहे.
• अत्यंत हलके असूनही, ते थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी आहे.
भौगोलिक संकेतांक (GI Tag) असलेली पश्मिना शॉल भारतात कोठे बनविली जाते ?
• पश्मिना शॉल्स हे भौगोलिक संकेतांक (GI Tag) प्रमाणित लोकर आहे. ते भारतातील काश्मीर प्रदेशातून आहे.
• काश्मीर खोऱ्यातील स्थानिक कारागिरांनी वापरलेल्या अनोख्या पारंपारिक प्रक्रियेमुळे काश्मीरच्या पश्मिना शॉल्स ने G.I टॅग मिळवला आहे.
• काश्मिरी लोक हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी पश्मिना शॉल वापरत.
• पाश्मिना' हा शब्द पर्शियन शब्द "पश्म" वरून आला आहे, ज्याचा अर्थ विणता येण्याजोगा तंतू असा होतो.
• पाश्मिना शॉल्स त्यांच्या लोकरच्या दर्जेदार गुणवत्तेमुळे आणि एकच तुकडा बनवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे खूप महाग आहेत.
• पश्मिना शाल विणण्यासाठी वापरली जाणारी लोकर लडाखमधील पाळीव चांगथंगी बकऱ्यांकडून (कॅपरा हिर्कस) मिळवले जाते.
भौगोलिक संकेतांक म्हणजे काय ?
GI Tag (Geographical Indication)
• एखाद्या भागातील वस्तू किंवा पदार्थ ही त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास त्यास भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग देण्यात येतो.
• Geographical Indication of goods (Registration and Protection) Act, 1999 हा कायदा भारतातील वस्तूंची संबंधित भौगोलिक संकेतांची नोंदणी आणि उत्तम संरक्षण करण्यास प्रयत्न करतो.
• 2004 मध्ये दार्जिलिंग टी (दार्जिलिंग चहा) GI टॅग मिळवणारा पहिले भारतीय उत्पादन होते.
GI टॅग असणारे महाराष्ट्रातील काही उत्पादक :
1. सोलापुरी चादर
2. पुणेरी पगडी
3. कोल्हापुरी चप्पल
4. पुरंदर अंजीर
5. मराठवाडा केसर आंबा
6. नाशिकचे द्राक्ष
7. नाशिक व्हॅली वाईन
8. वारली चित्रकला, इत्यादी.