
चालू घडामोडी 29, जानेवारी 2025 | वीरता पुरस्कार 2025 | Gallantry Awards 2025

वीरता पुरस्कार 2025
Gallantry Awards 2025
Subject : GS - पुरस्कार, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?
(सरळसेवा, पोलीस भरती, वनरक्षक भरती, रेल्वे भरती, SSC GD 2019)
1. परमवीर चक्र
2. महावीर चक्र
3. अशोक चक्र
4. कीर्ती चक्र
उत्तर : अशोक चक्र
बातमी काय आहे ?
• राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लष्करातील अधिकारी व कर्मचारी मिळून ९३ जणांना शौर्य पदके जाहीर केली.
• 'वीरता पुरस्कार' वर्षातून दोनदा जाहीर केले जातात - प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त.
2025 मध्ये कीर्ती चक्र पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?
• मेजर मनजित (22 राष्ट्रीय रायफल्स) आणि
• नायक दिलवर खान (मरणोत्तर, 28 राष्ट्रीय रायफल्स) यांना कीर्ती चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले.
युद्धकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार (वीरता पुरस्कार) :
परमवीर चक्र (Param Vir Chakra) :
युद्धादरम्यान (जमिनीवर, समुद्रात किंवा हवेत) उल्लेखनीय शौर्य दाखविल्याबद्दल हा भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे.
महावीर चक्र (Maha Vir Chakra) :
जमिनीवर, समुद्रात किंवा हवेत शत्रूच्या उपस्थितीत उल्लेखनीय शौर्याच्या कृत्यांसाठी हा दुसरा सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे.
वीर चक्र (Vir Chakra) :
परमवीर चक्र आणि महावीर चक्रानंतर हा देशातील तिसरा सर्वोच्च युद्धकालीन वीरता पुरस्कार आहे.
सर्वोच्च शांतता काळातील शौर्य पुरस्कार (वीरता पुरस्कार) :
अशोक चक्र (Ashoka Chakra) :
शांततेच्या काळात शौर्य, धाडसी कृती किंवा बलिदानासाठी हा सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे.
कीर्ती चक्र (Kirti Chakra) :
हा शांतताकाळातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे आणि शांतताकाळात धाडसी कृती किंवा आत्मत्यागासाठी दिला जातो.
शौर्य चक्र (Shaurya Chakra) :
हा शांतताकाळातील तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार
आहे. हा पुरस्कार सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांना अपवादात्मक शौर्यासाठी दिला जातो.