
चालू घडामोडी 30, जानेवारी 2025 | महात्मा गांधी पुण्यतिथी | Mahatma Gandhi Death Anniversary

महात्मा गांधी पुण्यतिथी
Mahatma Gandhi Death Anniversary
महात्मा गांधीजींना पुण्यतिथी दिनी आदरांजली 💐💐🙏
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती, आधुनिक भारताचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महात्मा गांधीजीनी खालील पैकी कोणत्या आंदोलनसाठी भारतीयांना 'करो या मरो' (करा किंवा मरा) हा मूलमंत्र दिला ?
1. चंपारण सत्याग्रह
2. खेडा सत्याग्रह
3. असहकार चळवळ
4. भारत छोडो आंदोलन
उत्तर : भारत छोडो आंदोलन
पूर्ण नाव : मोहनदास करमचंद गांधी
जन्म : 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला.
महात्मा गांधी हे वकील, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते.
दक्षिण आफ्रिकेतील लढा :
• दादा अब्दुल्ला या गुजराती व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील खटल्यासाठी गांधीजींची भेट घेतली त्यामुळे गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले.
• 1893 ते 1915 या काळात दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींनी वर्णद्वेष आणि तिथला अपमान पाहून भारतीय व्यापारी, कामगार यांच्या हक्कांसाठी लढा दिला.
• त्यांनी दक्षिण आफ्रिकेत इंडियन नाताळ काँग्रेसची स्थापना केली.
• इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राची सुरुवात केली.
• डर्बन शहराजवळ फिनिक्स आश्रम स्थापन केले.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील भूमिका :
• 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी भारतात परतले.
• 1917 मध्ये चंपारण सत्याग्रह - पहिली सविनय कायदेभंग चळवळ
• 1918 अहमदाबाद गिरणी कामगार संप (Ahmedabad Mill Strike) - पहिले उपोषण
• 1918 - खेडा सत्याग्रह - पहिलं असहकार आंदोलन
• वरील स्थानिक आंदोलनांनी देशव्यापी लढाई चा पाया मजबूत केला.
• 20 व्या शतकाच्या सुरुवातीला महात्मा गांधी हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रमुख नेते बनले, त्यांनी ब्रिटीश राजवटीला आव्हान देण्यासाठी अहिंसक मार्गाने आंदोलनचा पुरस्कार केला.

असहकार चळवळ (1920-1922) :
• गांधींनी जालियनवाला बाग हत्याकांड आणि दडपशाही रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी असहकार चळवळ सुरू केली.
• बोअर युद्धात बजावलेल्या कामगिरीबद्दल इंग्रजांनी गांधीजींना कैसर-ए-हिंद पदवी 1915 मध्ये बहाल केली होती.
• परंतु जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी 1920 मध्ये गांधीजींनी कैसर-ए-हिंद पदवी परत केली.

सविनय कायदेभंग चळवळ (1930) :
• सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात गांधीजींनी दांडी या मिठाच्या सत्याग्रहापासून केली.
• मिठाचा सत्याग्रह किंवा दांडी यात्रा (1930): ब्रिटीश मिठावरील कराचा निषेध करण्यासाठी गांधीजीनी 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 पर्यंत साबरमती आश्रम ते दांडी असा मोर्चा काढला.

भारत छोडो आंदोलन (1942) :
• या आंदोलनाला चले जाव आंदोलन म्हणूनही ओळखले जाते.
• भारत छोडो आंदोलन, भारतातील ब्रिटिश राजवट संपवण्याची मागणी केली.
• गांधीजीनी या आंदोलनसाठी भारतीयांना 'करो या मरो' (करा किंवा मरा) हा मूलमंत्र दिला.
• त्यांच्या घोषणेने लाखो लोकांना निषेध, संप आणि सविनय कायदेभंगाच्या कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली.

मृत्यू :
30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली.
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस केव्हा असतो ?
2 ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो
प्रश्न) महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ म्हणून सर्व प्रथम कोणी म्हटले ?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात.
प्रश्न) महात्मा गांधी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोणत्या वर्षी होते ?
1924 मधील बेळगाव अधिवेशन हे एकमेव काँग्रेस अधिवेशन होते ज्याचे अध्यक्ष गांधीजी होते.