
चालू घडामोडी 29, जानेवारी 2025 | इस्रोचे ऐतिहासिक 100 वे प्रक्षेपण | ISRO's Historic 100th Launch 🚀🎉

इस्रोचे ऐतिहासिक 100 वे प्रक्षेपण
ISRO's Historic 100th Launch 🚀🎉
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, इस्रोने ऐतिहासिक 100 वे प्रक्षेपण केले. तर NVS-02 उपग्रह खालील पैकी कोणत्या उद्देशाने प्रक्षेपित करण्यात आला आहे ?
1. हवामान अंदाज
2. उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली
3. अंतराळ विज्ञान
4. यापैकी नाही
उत्तर : उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली
बातमी काय आहे ?
अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) 100 व्या ऐतिहासिक प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केले.
इस्रोने ऐतिहासिक 100 वे प्रक्षेपण केव्हा आणि कोठून लॅान्च केले ?
• भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 29 जानेवारी 2025 च्या सकाळी 6.23 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून NVS-02 उपग्रह वाहून नेणारे GSLV-F15 रॅाकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित ( लॅान्च) केले.
• NVS-02 उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये स्थापित केला.
NVS-02 उपग्रह काय काम करेल ?
NVS-02 हा भारताच्या उपग्रह नेव्हिगेशन प्रणालीचा एक भाग आहे.
हे भारतातील GPS सारख्या नेव्हिगेशन वैशिष्ट्यांना अधिक सक्षम करण्यासाठी डिझाइन केले आहे.
NavIC - भारताची स्वतंत्र नेव्हिगेशन प्रणाली म्हणजे नेमकं काय ?
• NavIC (Navigation with Indian Constellation) ही भारताची स्वतंत्र प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली आहे.
• NavIC ही भारतीय उपखंडातील आणि 1,500 किमी पलीकडे असलेल्या प्रदेशांमधील वापरकर्त्यांना अचूक स्थिती, वेग आणि वेळ (PVT) सेवा देण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे.
• NVS-02 हा या मालिकेतील दुसरा उपग्रह आहे.
इस्रो ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली.
• भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो ही देशाची राष्ट्रीय अवकाश संस्था आहे
इस्रोचे मुख्यालय कोठे आहे ?
ISRO मुख्यालय बेंगळुरू (कर्नाटक) येथील अंतरीक्ष भवन येथे आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष कोण आहेत ?
• डॉ. व्ही. नारायणन हे इस्रोचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
• 14 जानेवारी 2025 पासून दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी डॉ. व्ही. नारायणन इस्रोचे अध्यक्ष म्हणून काम बघतील.