
चालू घडामोडी 30, जानेवारी 2025 | पद्म पुरस्कार 2025 | Padma Awards 2025

पद्म पुरस्कार 2025
Padma Awards 2025
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना खालील पैकी कोणता नागरी पुरस्कार नुकताच जाहीर झाला ?
1. भारतरत्न पुरस्कार
2. पद्मभूषण पुरस्कार
3. पद्मश्री पुरस्कार
4. पद्मविभूषण पुरस्कार
उत्तर : पद्मश्री पुरस्कार
पद्म पुरस्काराच्या तीन श्रेणीं कोणत्या ?
देशाच्या नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात.
पद्म पुरस्कार कोणाला देण्यात येतात ?
• कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/उपक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
- पद्मविभूषण पुरस्कार : असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार दिला जातो.
- पद्मभूषण पुरस्कार : उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ पुरस्कार दिला जातो.
- पद्मश्री पुरस्कार : कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
पद्म पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात येतात ?
- दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.
- हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी साधारणपणे मार्च/एप्रिलच्या सुमारास राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात.
2025 साठी किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत ?
- वर्ष 2025 साठी एकूण 139 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
- यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
- पुरस्कार विजेत्यांमध्ये 23 महिला आहेत.
- या यादीत परदेशी/NRI/PIO/OCI या श्रेणीतील 10 व्यक्ती आणि 13 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.
2025 साठी किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत ?
7 व्यक्तींना 2025 साठी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
2025 साठी किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत ?
- 19 व्यक्तींना 2025 साठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
- पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 3 मान्यवरांचा समावेश आहे.
- सार्वजनिक सेवेतील मनोहर जोशी (मरणोत्तर)
- प्रख्यात गायक पंकज उधास (मरणोत्तर)
- दिग्दर्शक शेखर कपूर यांचा समावेश आहे.
2025 साठी किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत ?
113 व्यक्तींना 2025 साठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत ?
2025 साठी महाराष्ट्रातील कोणास पद्मश्री पुरस्कार मिळाला ?
पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 मान्यवरांचा समावेश आहे.
- चित्रकार वासुदेव कामत
- अभिनेते अशोक सराफ
- सुलेखनकार अच्युत पालव
- वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली
- डॉ. विलास डांगरे
- पर्यावरण कार्यकर्ते चैत्राम पवार
- व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील अरुंधती भट्टाचार्य
- गायिका जसपिंदर नरूला
- बासरी वादक राणेंद्र (रोनू )भानू मुजुमदार
- कृषी क्षेत्रातील सुभाष शर्मा
- गायिका अश्विनी भिडे देशपांडे
यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.