
चालू घडामोडी 01, फेब्रुवारी 2025 | भारतीय तटरक्षक दल दिन | Indian Coast Guard Raising Day

भारतीय तटरक्षक दल दिन
Indian Coast Guard Raising Day
Subject : GS - दिनविशेष, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय तटरक्षक दल दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
(नाविक GD 2022)
1. 1 फेब्रुवारी
2. 2 फेब्रुवारी
3. 3 फेब्रुवारी
4. 4 फेब्रुवारी
उत्तर : 1 फेब्रुवारी
बातमी काय आहे ?
भारतीय तटरक्षक दलाने 1 फेब्रुवारी 2025 रोजी आपला 49 वा स्थापना दिन साजरा केला.
भारतीय तटरक्षक दलाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी करण्यात आली.
भारतीय तटरक्षक दलाचे कर्तव्य काय आहे ?
भारतीय तटरक्षक दल काय काम करते ?
• सागरी पर्यावरण आणि पर्यावरणाचे रक्षण करणे आणि दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण करणे.
• वैज्ञानिक डेटा गोळा करणे.
• युद्धादरम्यान नौदलाला पाठिंबा देणे.
• संकटात सापडलेल्या खलाशांना मदत करणे आणि समुद्रातील जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करणे.
• समुद्र, शिकार, तस्करी आणि अंमली पदार्थांबाबत सागरी कायदे लागू करणे.
• तेल, मासे आणि खनिजांसह आपल्या महासागर आणि किनाऱ्यावरील संपत्तीचे रक्षण करणे.
भारतीय तटरक्षक दलाचे ब्रीदवाक्य कोणते ?
" वयम रक्षामः" - आम्ही संरक्षण करतो ("VAYAM RAKSHAMAH" - WE PROTECT) हे भारतीय तटरक्षक दलाचे ब्रीदवाक्य आहे.
भारतीय तटरक्षक दलाचे वर्तमान महासंचालक कोण आहेत ?
Who is the Current Director General of Indian Coast Guard?
• श्री परमेश शिवमणी (Paramesh Sivamani) हे भारतीय तटरक्षक दलाचे वर्तमान महासंचालक (Director General of the Indian Coast Guard) आहेत.
• श्री परमेश शिवमणी हे भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक आहेत.
• महासंचालक परमेश शिवमणी यांनी भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून ऑक्टोबर 2024 मध्ये पदभार स्वीकारला.

भारतीय तटरक्षक दलाचे पहिले महासंचालक कोण ?
Who was the first Director General of Indian Coast Guard ?
वाइस एडमिरल वी. ए. कामथ (Vice Admiral V.A.Kamath) हे भारतीय तटरक्षक दलाचे संस्थापक (पहिले) महासंचालक होते.