
चालू घडामोडी 31, जानेवारी 2025 | राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिन | National Commission for Women Foundation Day

राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिन
National Commission for Women Foundation Day
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
1. 1984
2. 1992
3. 2002
4. 2014
उत्तर : 1992
राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 31 जानेवारी 2025 रोजी आपला 33 वा स्थापना दिन साजरा केला.
• या प्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

33 व्या राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिनाची संकल्पना थीम काय आहे ?
• या वर्षीची थीम "नारी तू नारायणी" अशी आहे.
• ही संकल्पना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या शौर्य आणि नेतृत्वाने प्रेरित आहे.
• यंदाची संकल्पना महिलांच्या शक्तीचा, संघर्षाचा आणि समाजातील त्यांच्या योगदानाचा आदर करण्याचा संदेश देते.
राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 31 जानेवारी 1992 रोजी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.
• राष्ट्रीय महिला आयोग कायदा, 1990 अंतर्गत या आयोगाची स्थापन करण्यात आली आहे.
• राष्ट्रीय महिला आयोग ही एक स्वायत्त आणि वैधानिक संस्था (Autonomous and Statutory Body) आहे.
• राष्ट्रीय महिला आयोग सल्लागार संस्था आहे.
• या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत आणि ते प्रकरणांची चौकशी करू शकतात आणि विभागांकडून अहवाल मागवू शकतात. हा आयोग कोणत्याही व्यक्ती किंवा अधिकाऱ्याला समन्सही जारी करू शकतात.
राष्ट्रीय महिला आयोगाची मुख्य कार्य कोणती ?
• महिलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारी प्रकरणे हाताळणे.
• महिलांच्या सुरक्षेसाठी घटनात्मक आणि कायदेशीर चौकटीचे पुनरावलोकन करणे.
• महिला सुरक्षेच्या मुद्द्यांची तपासणी करणे
• तक्रार निवारणाची सोय करणे
• केंद्र सरकारला अहवाल सादर करणे
• महिलांशी संबंधित धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या ?
• जयंती पटनायक या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा होत्या.
• पहिला आयोग 31 जानेवारी 1992 रोजी स्थापन करण्यात आला.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या विद्यमान (वर्तमान) अध्यक्षा कोण आहेत ?
• श्रीमती. विजया किशोर रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्षा आहेत.
• त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या 9व्या अध्यक्ष आहेत.