
चालू घडामोडी 01, फेब्रुवारी 2025 | अॅक्सिओम-४ मोहिमेसाठी भारतीय पायलट ? | Indian Pilot for Axiom-4 mission ?

अॅक्सिओम-4 मोहिमेसाठी भारतीय पायलट
Indian Pilot for Axiom-4 Mission
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अॅक्सिओम-४ मोहिमेचे पायलट म्हणून खालील पैकी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आली आहे ?
1. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर
2. ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन
3. ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप
4. विंग कमांडर शुभांशू शुक्ला
उत्तर : विंग कमांडर शुभांशू शुक्ला

बातमी काय आहे ?
• लखनौ येथील शुभांशू शुक्ला यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (International Space Station) अॅक्सिओम मिशन-4 चे पायलट म्हणून निवड झाली आहे.
• आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये प्रवास करणारे शुभांशू शुक्ला हे इस्रो चे पहिले अंतराळवीर असतील.
Axiom मिशन-4 काय आहे ?
• ही एक खाजगी अंतराळ मोहीम आहे.
• अॅक्सिओम मिशन-4 चे क्रू फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून (SpaceX Dragon Spacecraft) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रक्षेपित होईल.
• 14 दिवसांच्या या मोहिमेत अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध वैज्ञानिक प्रयोग करणार असून, तंत्रज्ञानांची तपासणी आणि अवकाश तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांमध्ये प्रसारही करतील.
Axiom मिशन-4 चे उद्दिष्ट काय आहे ?
अॅक्सिओम मिशन 4 (अॅक्स-4) चा उद्देश आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) खाजगी पथक पाठवून व्यावसायिक अंतराळ उड्डाणांना चालना देणे, वैज्ञानिक संशोधन करणे, तांत्रिक विकास, अवकाश पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे आहे.
कोण असणार Axiom मिशन 4 चे अंतराळवीर ?



