
चालू घडामोडी 01, फेब्रुवारी 2025 | 3रे विश्व मराठी संमेलन | Vishwa Marathi Sammelan 2025

3रे विश्व मराठी संमेलन
Vishwa Marathi Sammelan 2025
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ३ रे विश्व मराठी संमेलन खालील पैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले ?
1. पुणे
2. मुंबई
3. नागपूर
4. दिल्ली
उत्तर : पुणे
३रे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात आले ?
- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
- या संमेलनात मराठी संस्कृती व मराठी भाषा यांचेबाबत चर्चासत्र, मराठी संस्कृतीचे प्रदर्शन करणारे नाट्यसंगीत, वादन इ. विविध कलांचा अविष्कार त्याचप्रमाणे विविध चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे.
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे.
३ ऱ्या विश्व मराठी संमेलनाची संकल्पना (थीम) कोणती ?
- अभिजात मराठी ही या विश्व मराठी संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
३ ऱ्या विश्व मराठी संमेलनाचा साहित्यभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
- वयाच्या चौथ्या वर्षापासून साहित्य निर्मितीस सुरूवात करुन वयाच्या 93 व्या वर्षी सर्व प्रकारचे साहित्य निर्माण केलेल्या सृजनशील साहित्यिक पद्मश्री मंगेश कर्णिक यांना या संमेलनाचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार देण्यात आला.
विश्व मराठी संमेलनाचे आयोजन का करण्यात येते ?
विश्व मराठी संमेलनाचे उद्दिष्ट काय आहे ?
- महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरिक आहेत.
- भाषा जिवंत ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना एकत्र येता यावे,
- मराठी भाषेचे संवर्धन व जगभर प्रसार व्हावा या उद्देशाने विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.