
चालू घडामोडी 04, फेब्रुवारी 2025 | BCCI जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ? | BCCI Lifetime Achievement Award

BCCI जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला ?
BCCI Lifetime Achievement Award
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच कोणत्या खेळाडूला कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
1. सचिन तेंडुलकर
2. महेंद्रसिंग धोनी
3. रोहित शर्मा
4. विराट कोहली
उत्तर : सचिन तेंडुलकर
बातमी काय आहे ?
- BCCI च्या नमन पुरस्कार सोहळ्यात श्री सचिन तेंडुलकर यांचा कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
- मुंबईच्या BCCI च्या मुख्यालयात हा सोहळा पार पडला.
- रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्पर्धा परीक्षेसाठी BCCI पुरस्कार 2025 विजेत्यां संदर्भात काही IMP वनलाईनर पॉईंट्स :
BCCI Awards 2025 Winners :
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष) : जसप्रीत बुमराह
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (महिला) : स्मृती मंधाना
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (Best International Debut) (पुरुष) : सरफराज खान
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (Best International Debut) (महिला) : आशा शोभना
- देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट व्हाईट बॉल अष्टपैलू खेळाडू : शशांक सिंग
- देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट रेड बॉल अष्टपैलू खेळाडू : तनुष कोटियन
कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे.
- भारताचे पहिले कसोटी क्रिकेट कर्णधार कर्नल सी.के. नायडू यांच्या सन्मानार्थ BCCI द्वारे हा पुरस्कार देण्यात येतो.
- पहिला, कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार 1994 मध्ये भारताचे पहिले कसोटी शतकवीर श्री लाला अमरनाथ यांना देण्यात आला.
- कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार मिळालेले श्री सचिन तेंडुलकर हे 31वे प्राप्तकर्ते आहे.
