
चालू घडामोडी 04, फेब्रुवारी 2025 | पुरूष हॉकी इंडिया लीग कोणी जिंकली ? | Who won Hockey India League 2025 ?

पुरूष हॉकी इंडिया लीग कोणी जिंकली ?
Hockey India League 2025
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 6 वी पुरूष हॉकी इंडिया लीग (2024-25) खालील पैकी कोणी जिंकली ?
- तमिलनाडु ड्रैगंस
- हैदराबाद तूफांस
- श्राची राढ़ बंगाल टाइगर्स
- दिल्ली एसजी पाइपर्स
उत्तर : श्राची राढ़ बंगाल टाइगर्स (Shrachi Rarh Bengal Tigers)
बातमी काय आहे ?
- अलिकडेच श्राची राढ़ बंगाल टायगर्सने हॉकी इंडिया लीग 2024-25 जिंकली.
- अंतिम सामन्यात हैदराबाद तूफांसचा 4-3 असा पराभव करून त्यांनी विजेतेपद पटकावले.

पुरूष हॉकी इंडिया लीग बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
- विजेता संघ : श्राची राढ़ बंगाल टाइगर्स (Shrachi Rarh Bengal Tigers)
- उपविजेता संघ : हैदराबाद तूफांस (Hyderabad Toofans)
- अंतिम सामना बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम, राउरकेला (ओडिशा) येथे खेळवण्यात आला.
- विजेता संघ श्राची राढ़ बंगाल टाइगर्सला 3 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.
- तर उपविजेत्या हैदराबाद तूफांसला 2 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.
- श्राची राढ़ बंगाल टाइगर्सने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले.
6 व्या(2024-25) पुरुष हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू (Player of the Tournament) कोण ?
उत्तर : श्राची राढ़ बंगाल टाइगर्सचा सुखजीत सिंग (Sukhjeet Singh).

पुरुष हॉकी इंडिया लीग बद्दल परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती :
- हॉकी इंडिया लीग ही भारतातील हॉकीसाठीची प्रमुख क्लब-आधारित स्पर्धा आहे ज्यामध्ये परदेशी खेळाडू देखील सहभागी होतात.
- पुरूष हॉकी इंडिया लीगची पहिली आवृत्ती 2013 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि 2017 पर्यंत दरवर्षी आयोजित केली जात होती.
- 2017 नंतर तब्बल सात वर्षांच्या अंतरानंतर, पुरुष हॉकी इंडिया लीगची सहावी आवृत्ती 2024-25 मध्ये ओडिशातील राउरकेला येथे आयोजित करण्यात आली होती.
हॉकी इंडियाने आयोजित करण्याचे उद्दिष्ट कोणते ?
- हॉकी इंडियाने आयोजित केलेल्या या लीगचे उद्दिष्ट भारतीय हॉकी खेळाडूंना उच्च दर्जाचे व्यासपीठ देणे.
- आंतरराष्ट्रीय हॉकी स्तरावरील काही सर्वोत्तम परदेशी खेळाडूंसोबत भारतीय खेळाडूंना खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधी देऊन त्यांचा दर्जा सुधारणे आहे.
- हॉकी इंडिया लीगद्वारे भारतातील अनेक हॉकी खेळाडूंना ओळख आणि अनुभव मिळाला.