
चालू घडामोडी 05, फेब्रुवारी 2025 | माउंट तारानाकीला मानवी दर्जा | Mount Taranaki

माउंट तारानाकीला मानवी दर्जा
Mount Taranaki
Subject : GS - भूगोल
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच माउंट तारानाकी या पर्वताला कायदेशीर जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा देण्यात आला. तर हा पर्वत खालील पैकी कोणत्या देशात आहे ?
- भारत
- चीन
- ब्राझील
- न्यूझीलंड
उत्तर : न्यूझीलंड
बातमी काय आहे ?
- न्यूझीलंडच्या संसदेत तारानाकी माऊंगा सामूहिक निवारण मसुदा पारित करण्यात आला.
- डोंगर आणि आसपासची जमीन सुरक्षित राहिल याची हमी या कायद्याने मिळाली.
माउंट तारानाकी बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
- अलिकडेच ऐतिहासिक निर्णयात न्यूझीलंडमधील माउंट तारानाकी (तारनाकी मौंगा) ला कायदेशीर व्यक्तिमत्व म्हणजेच जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा देण्यात आला आहे.
- न्यूझीलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेला तारानाकी पर्वत 2518 मीटर उंच सुप्त ज्वालामुखी आहे.
- न्यूझीलंडमधील स्थानिक माओरी लोक बर्फाच्छादित तारानाकी मौंगाचा पवित्र पूर्वज म्हणून आदर करतात.
- डोंगर आणि त्यासारख्या नैसर्गिक गोष्टी या जिवंत आहेत आणि त्या आमच्या समाजाच्या पूर्वज आहेत या माओरी दृष्टीकोनालाही या कायद्यामुळे मान्यता मिळाली.
- ईवी या स्थानिक आदिवासी जमातीतील आणि सरकारमधील प्रतिनिधी यांची एक समिती या डोंगराच्या हक्क्कांचं आणि अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी नेमली जाईल.
- न्यूझीलंडमध्ये याआधी ही 2014 मध्ये उरेवेरा या जंगलाला पहिल्यांदा जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा असा अधिकार मिळाला होता.
- त्यानंतर 2017 मध्ये वांगानुई नदीलाही जिवंत मानवी अस्तित्वाचा अधिकार प्राप्त झाले होते.
जिवंत मानवी अस्तित्वाच्या अधिकाराचा फायदा काय होईल ?
- कायदेशीर मानवी दर्जामुळे जमीन विक्री, शोषण आणि पर्यावरणीय ऱ्हासापासून संरक्षण मिळते.
- पारंपारिक माओरी संवर्धन पद्धती आणि स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांचे जतन यावर लक्ष केंद्रित केले जाते.
मार्च 2017 मध्ये, भारतातील उच्च न्यायालयाने कोणत्या दोन नद्यांना जिवंत मानवी अस्तित्वाचा दर्जा दिला होता ?
(CAPF 2017)
- गंगा आणि यमुना
- उत्तराखंड उच्च न्यायालयाने 2017 मध्ये गंगा आणि यमुना नद्या कायदेशीर किंवा कायदेशीर व्यक्ती म्हणून घोषित केल्या.
- ज्यामुळे "जिवंत व्यक्ती" चे सर्व हक्क, कर्तव्ये आणि दायित्वे असतात ते सर्व या नद्यांना मिळाले.