
चालू घडामोडी 06, फेब्रुवारी 2025 | अर्थसंकल्प म्हणजे काय ? | What is Budget ?

अर्थसंकल्प म्हणजे काय ?
What is Budget ?
Subject : GS - अर्थशास्त्र - अर्थसंकल्प, राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय संविधानाच्या कलम 112 अंतर्गत तयार केलेल्या वार्षिक आर्थिक विवरणपत्राला ------ म्हणतात.
(NTPC 2016)
1. सार्वजनिक खाते
2. संचित खाते
3. अर्थसंकल्प
4. महसूल खाते
उत्तर : अर्थसंकल्प (Budget)
बजेट शब्द कोठून आला ?
- बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम 1733 मध्ये वापरण्यात आला.
- फ्रेंच शब्द बोगेट पासून बजेट या शब्दाची उत्पत्ती झाली. याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होतो.
अर्थसंकल्प म्हणजे काय ?
- वित्तीय वर्षातील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती तसेच मागील वर्षांच्या परिस्थितीचा आढावा, नवीन कर, योजना व भांडवली खर्च भागविण्याची व्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प होय.
- भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार केंद्र सरकारचा तर कलम 202 नुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो.
प्रश्न) शासकीय अर्थसंकल्पाचे एकूण किती प्रकार आहेत ?
(MPSC Group C 2019)
1. 2
2. 3
3. 4
4. वरील पैकी कोणतेही नाही.
उत्तर : 3
अर्थसंकल्पाचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत :
1) शिलकीचा अर्थसंकल्प (Surplus Budget) :
• जेव्हा सरकारचे उत्पन्न हे खर्चापेक्षा अधिक असते. त्यास शिलकीचा अर्थसंकल्प असे म्हणतात.
• म्हणजे पुढच्या वर्षभरातील अपेक्षित उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा अधिक असते आणि शेवटी काही शिल्लक राहते.
2) तुटीचा अर्थसंकल्प (Deficit Budget) :
• जेव्हा सरकारचे उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी असते, त्यास तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात.
• म्हणजे येत्या वर्षभरात सरकारकडे जेवढे उत्पन्न निर्माण होणार असते त्यापेक्षा सरकारचा खर्च जास्त असतो.
3) संतुलित अर्थसंकल्प (Balanced Budget) :
• जेव्हा सरकारचा खर्च आणि उत्पन्न हे समान असते, त्यास संतुलित अर्थसंकल्प किंवा समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात.
• म्हणजे येत्या एका वर्षात सरकार जेवढा खर्च करणार असते तेवढेच सरकारला उत्पन्नही मिळणार असते.
भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरला आहे का ?
- नाही
- भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नसून वार्षिक वित्तीय विवरण पत्रक (Annual Financial Statements) हा शब्द वापरण्यात आला आहे.
भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी आणि केव्हा मांडला ?
भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन (James Wilson) यांनी मांडला.
स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी आणि केव्हा मांडला ?
भारताचे पहिले अर्थमंत्री आर. के. षन्मुखम चेट्टी (R.K Shanmukham Chetty) यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला.
