
चालू घडामोडी 06, फेब्रुवारी 2025 | चंद्रिका टंडन यांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला | Chandrika Tandon Won Grammy Award

चंद्रिका टंडन यांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला
Chandrika Tandon Won Grammy Award
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय-अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले ?
- त्रिपुरा
- संगम
- त्रिलोक
- त्रिवेणी
उत्तर : त्रिवेणी (Triveni)
बातमी काय आहे ?
- संगीतकार चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
- चंद्रिका टंडन यांनी दक्षिण आफ्रिकेच्या बासरीवादक वाउटर केलरमॅन आणि जपानी सेलिस्ट इरु मात्सुमोतो यांच्याबरोबर 'त्रिवेणी' अल्बमवर काम केलं होतं.
- या अल्बमसाठी त्यांना, बेस्ट न्यू एज, ॲम्बियंट ऑर चांट अल्बम'साठी ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
67 वा ग्रॅमी पुरस्कार 2025 सोहळा कुठे पार पडला ?
- 2 फेब्रुवारी 2025 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस या ठिकाणी हा सोहळा पार पडला.
ग्रॅमी पुरस्कारा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
- ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा पुरस्कार आहे.
- ग्रॅमी पुरस्कार हा संगीतातील सर्वात प्रतिष्ठित सन्मान आहे.
- ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो.
- ग्रॅमी पुरस्काराला संगीत क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार म्हणूनही ओळखले जाते.
- पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा 4 मे 1959 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेल्स व न्यू यॉर्क ह्या शहरांमध्ये साजरा झाला.
ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण ?
(SSC CHSL 2021, SSC MTS 2022, सरळसेवा भरती)
- सतारवादक पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहेत.
- त्यांना 1968 मध्ये ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
"ग्रॅमी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड" मिळवणारे पहिले भारतीय कोण ?
(SSC MTS 2022, सरळसेवा भरती)
- सतारवादक पंडित रविशंकर हे "ग्रॅमी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड" मिळवणारे पहिले भारतीय संगीतकार आहेत.
- पंडित रविशंकर यांना मरणोत्तर २०१३ मध्ये ग्रॅमी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.