
चालू घडामोडी 06, फेब्रुवारी 2025 | लता मंगेशकर स्मृती दिन | Lata Mangeshkar Death Anniversary

लता मंगेशकर स्मृती दिन
Lata Mangeshkar Death Anniversary
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) लता मंगेशकर यांना ----- वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
(सरळसेवा भरती, SSC CGL 2022)
1. 2003
2. 2001
3. 1997
4. 1999
उत्तर : 2001
भारतरत्न लता मंगेशकर यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
- जन्म : लता मंगेशकरांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदौर शहरात झाला.
- भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारताची गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.
- लतादीदींनी तब्बल 36 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती.
- त्यांनी 25000 हून अधिक गाणी गायली.
- गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे.
- वयाच्या 13 व्या वर्षी वसंत जोगळेकर यांच्या ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले.
- मृत्यू : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.
पुरस्कार आणि सन्मान :
आपल्या दीर्घ कारकिर्दीत लतादीदींना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. काही महत्त्वाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे :
- पद्मभूषण (1969)
- दादासाहेब फाळके पुरस्कार (1989)
- महाराष्ट्र भूषण (1997)
- पद्मविभूषण (1999)
- भारतरत्न (2001)
- लीजन ऑफ ऑनर - 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार :
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणा द्वारे दिला जातो ?
- मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे हा पुरस्कार दिला जातो.
- या पुरस्काराची सुरुवात 2022 मध्ये करण्यात आली.
- 2024 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार श्री अमिताभ बच्चन यांना देण्यात आला.
लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या राज्याद्वारे दिला जातो ?
- मध्य प्रदेश सरकारकडून हा पुरस्कार देण्यात येतो.
- हा पुरस्कार 28 सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी दिला जातो.
- या पुरस्काराची सुरुवात 1984 मध्ये केले गेली.
- संगीत क्षेत्रातील कलात्मक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.