
चालू घडामोडी 10, फेब्रुवारी 2025 | टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली ? | 87th Tata Steel Chess Tournament

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली ?
87th Tata Steel Chess Tournament
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच 87 वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली ?
- विश्वनाथन आनंद
- मैग्नस कार्लसन
- डी गुकेश
- आर प्रज्ञानंद
उत्तर : आर प्रज्ञानंद (R Praggnanandhaa)
बातमी काय आहे ?
• 87 व्या टाटा स्टील मास्टर्स 2025 या बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने नाव कोरले.
• आर प्रज्ञानंदने विश्वविजेता डी गुकेशचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली.
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धे बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
(Tata Steel Chess Tournament)
• टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा ही नेदरलँड्समध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक स्पर्धा आहे.
• टाटा स्टील या स्पर्धेचे प्रायोजक (Sponsor) असल्याने तिला टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा असे म्हणतात.
• ही स्पर्धा " बुद्धिबळाचे विम्बल्डन " (Wimbledon of Chess) म्हणूनही ओळखली जाते.
टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा सर्वाधिक वेळा कोणी जिंकली ?
• नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने (Magnus Carlsen) ही स्पर्धा सर्वाधिक वेळा, म्हणजे 8 वेळा जिंकली आहे.
• भारताच्या विश्वनाथन आनंद यांनी 1989, 1998, 2003, 2004, आणि 2006 असे 5 वेळा टाटा स्टीलचे विजेतेपद जिंकले आहे.
• 2024 (86वी आवृत्ती) चा विजेता चीनचा वेई यी (Wei Yi) होता.
• 2025 (87वी आवृत्ती) चा विजेता भारताचा आर प्रज्ञानंद.