
चालू घडामोडी 10, फेब्रुवारी 2025 | ट्रोपेक्स-25 युद्ध सराव | EXERCISE TROPEX-25

ट्रोपेक्स-25 युद्ध सराव
EXERCISE TROPEX-25
Subject : GS - संरक्षण - युद्ध अभ्यास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ट्रोपेक्स-25 (TROPEX-25) सराव कोणत्या कालावधीत आयोजित केला जात आहे ?
1. जानेवारी ते मार्च 2025
2. मार्च ते एप्रिल 2025
3. जानेवारी ते डिसेंबर 2025
4. फेब्रुवारी ते मे 2025
उत्तर : जानेवारी ते मार्च 2025
बातमी काय आहे ?
भारतीय नौदलाच्या कॅपस्टोन थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज (TROPEX) ची 2025 आवृत्ती सध्या हिंदी महासागर क्षेत्रात (Indian Ocean Region) सुरू आहे.

TROPEX युद्ध सरावा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
THEATRE LEVEL OPERATIONAL READINESS EXERCISE (TROPEX-25) :
• हा भारतीय नौदलाचा सर्वात मोठा सागरी सराव आहे.
• त्यात भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दल यांचा समावेश आहे.
• हा सागरी सराव दर 2 वर्षांनी हिंदी महासागरात आयोजित केला जातो.
• TROPEX 25, सराव जानेवारी ते मार्च 2025 या तीन महिन्यांच्या कालावधीत आयोजित केला जात आहे.
TROPEX 25 युद्ध सराव कसा असेल ?
• हा ऑपरेशनल लेव्हल, (युध्द सज्जता) सराव आहे.
• हा सराव विविध टप्प्यांमध्ये आयोजित केला जात आहे.
• बंदर आणि समुद्रात दोन्ही ठिकाणी, ज्यामध्ये लढाऊ ऑपरेशन्स, सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध ऑपरेशन्स, संयुक्त वर्क अप फेज दरम्यान थेट शस्त्रास्त्र गोळीबार आणि उभयचर सराव (AMPHEX) यांचा समावेश असेल.
TROPEX युद्ध सरावाचे फायदे काय ?
• या सागरी सरावामुळे भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दल यांना आपापसात ऑपरेशनल (कार्यान्वयन) पातळीवरचा संवाद साधायला मदत होते.
• ज्यामुळे गुंतागुंतीच्या परिस्थितीत एकमेकांबरोबर समन्वय साधून काम करण्याची त्यांची क्षमता आणखी मजबूत होते.