
चालू घडामोडी 08, फेब्रुवारी 2025 | फोर्ट विल्यम या किल्ल्याचे नवीन नाव काय ?

फोर्ट विल्यम या किल्ल्याचे नवीन नाव काय ?
Fort William Renamed As ?
Subject : GS - संरक्षण, इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) लष्कराच्या पूर्व कमांडचे मुख्यालय असलेल्या फोर्ट विल्यम या किल्ल्याचे नवीन नाव काय ?
1. लाल किल्ला
2. विजय दुर्ग
3. प्रतापगड
4. तोरणा किल्ला
उत्तर : विजय दुर्ग
बातमी काय आहे ?
- लष्कराच्या पूर्व कमांडचे मुख्यालय असलेल्या फोर्ट विल्यमचे नाव बदलून विजय दुर्ग करण्यात आले आहे.
- त्याचबरोबर फोर्ट विल्यममधील किचनर हाऊसचे नाव बदलून माणेकशॉ हाऊस (Manekshaw House) करण्यात आले आहे,
- तर दक्षिण गेट, ज्याला पूर्वी सेंट जॉर्ज गेट म्हटले जात होते, ते आता छत्रपती शिवाजी महाराज गेट म्हणून ओळखले जाईल.
फोर्ट विल्यम किल्ला कोणी बांधला ?
फोर्ट विल्यम किल्ल्याचा इतिहास काय आहे ?
- फोर्ट विल्यम हा किल्ला कोलकाता येथे हुगळी नदीच्या पूर्वेकडील तीरावर आहे.
- मूळ किल्ला 1696 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बांधला होता.
- या किल्ल्याचे मूळ नाव इंग्लंडचे राजा विल्यम तिसरे (King William III) यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते.
- 1756 मध्ये कलकत्त्याच्या वेढा दरम्यान सिराज-उद-दौलाने ब्रिटिशांचा पराभव केला तेव्हा या किल्ल्याचे नुकसान झाले.
- पुढे 1757 च्या प्लासीची लढाई ब्रिटिशांनी जिंकली.
- प्लासीच्या लढाईनंतर, रॉबर्ट क्लाइव्हने 1758 ते 1781 दरम्यान एका नवीन ठिकाणी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली.
- सध्या फोर्ट विल्यम हे भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे मुख्यालय आहे. (SSC GD 2021)
फोर्ट विल्यमचे नाव बदलून विजय दुर्ग का ठेवण्यात आले ?
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नौदल तळ म्हणून काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील सर्वात जुन्या किल्ल्यावरून या किल्ल्याचे नाव विजय दुर्ग असे ठेवण्यात आले आहे.
- विजय दुर्ग भारतीय लष्करी सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतो.
- फोर्ट विल्यमचे नाव विजय दुर्ग असे बदलणे हे वसाहतवादी वारशापेक्षा भारतीय वारसा आणि लष्करी अभिमानाकडे वळण्याचे प्रतीक आहे.