
चालू घडामोडी 11, फेब्रुवारी 2025 | 3रा सायक्लोन युद्ध सराव | EXERCISE CYCLONE-III

3 रा सायक्लोन युद्ध सराव
EXERCISE CYCLONE-III
Subject : GS - संरक्षण, युद्ध अभ्यास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) सायक्लोन (CYCLONE) सराव खालील पैकी कोणत्या देशांमधील विशेष दलांचा संयुक्त सराव आहे ?
- भारत आणि अमेरिका
- भारत आणि नेपाळ
- भारत आणि इजिप्त
- भारत आणि श्रीलंका
उत्तर : भारत आणि इजिप्त
सायक्लोन (CYCLONE) सरावा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
सायक्लोन (CYCLONE) हा भारत आणि इजिप्त या देशांच्या विशेष दलांचा (SPECIAL FORCES) संयुक्त सराव आहे.
सायक्लोन (CYCLONE) सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
• 2025 मध्ये सायक्लोन (CYCLONE) या आयोजन राजस्थान येथे करण्यात आले.
• सायक्लोन (CYCLONE) या सरावाची यंदाची तिसरी आवृत्ती आहे.
• हा सराव 10 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित केला आहे.
• सायक्लोन सराव हा भारत आणि इजिप्तमध्ये दर वर्षी पाळीपाळीने आयोजित होणारा वार्षिक सराव उपक्रम आहे.
• या सरावाची मागची आवृत्ती इजिप्तमध्ये जानेवारी 2024 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
सायक्लोन (CYCLONE) सरावात सहभागी युनिट्स :
• 25 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व दोन स्पेशल फोर्स बटालियन मधील सैनिक करतील.
• 25 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या इजिप्तच्या तुकडीचे प्रतिनिधीत्व विशेष दल आणि इजिप्शियन विशेष दलाचा टास्क फोर्स हे मिळून करतील.
सायक्लोन (CYCLONE) सरावाचे उद्दीष्ट काय ?
• संयुक्त कारवाई क्षमता विकास आणि विशेष कारवाईसाठी रणनीतींची परस्पर देवाणघेवाण करून दोन्ही देशांमधील लष्करी संबंधांना प्रोत्साहन आणि बळकटी देणे हे सायक्लोन सरावाचे उद्दिष्ट आहे.
सायक्लोन (CYCLONE) सरावाचा फायदा काय होईल ?
• सायक्लोन हा सराव दोन्ही देशांना आपापल्या रणनीतीतील सर्वोत्तम डावपेच आणि कारवाया आयोजित करण्याच्या कार्यपद्धतींद्वारे त्यांच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास सक्षम करेल.
• या सरावामुळे दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये सौहार्द भावना वाढवण्यास मदत होईल.