
चालू घडामोडी 14, फेब्रुवारी 2025 | इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप कोणी जिंकली ? | 91st Billiards and Snooker National Championships

इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप कोणी जिंकली ?
91st Billiards and Snooker National Championships
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 91 वी बिलियर्ड्स आणि स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024 कोणी जिंकली ?
1. पंकज अडवाणी
2. ब्रिजेश दमाणी
3. आदित्य मेहता
4. सौरव कोठारी
उत्तर : पंकज अडवाणी
बातमी काय आहे ?
श्री पंकज अडवाणी यांनी 91 वी बिलियर्ड्स आणि स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024 जिंकली.

91 वी बिलियर्ड्स आणि स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024 बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
(91st Billiards and Snooker National Championships 2024)
• 2025 मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथे वरिष्ठ, ज्युनियर आणि सब ज्युनियरसाठी 91 वी बिलियर्ड्स आणि स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली होती.
• पंकज अडवाणीने त्याचे 36 वे राष्ट्रीय बिलियर्ड्स आणि 10 वे स्नूकर विजेतेपद जिंकले.
• पंकज अडवाणीने अंतिम सामन्यात ब्रिजेश दमाणी यांना हरवले.
• ही स्पर्धा बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केली होती.
बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडिया :
Billiards and Snooker Federation of India :
• बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडिया ही भारतातील बिलियर्ड्स, स्नूकर आणि पूल या क्युइस्ट खेळांची प्रशासकीय संस्था आहे.
• बिलियर्ड्स आणि स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा ही आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताची एकमेव पात्रता स्पर्धा आहे.
• मुख्यालय- बेंगळुरू, कर्नाटक
श्री पंकज अडवाणी बद्दल :
• पंकज अडवाणी हा एक आघाडीचा भारतीय स्नूकर आणि बिलियर्ड्स खेळाडू आहे.
• 2003 मध्ये श्री पंकज अडवाणी यांनी सिनियर स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली.
• केवळ १७ व्या वर्षी ही चॅम्पियनशिप जिंकून श्री पंकज अडवाणी सर्वात तरुण राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियन बनले.
• श्री पंकज अडवाणीने जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेत 17 सुवर्णपदके जिंकली आहेत.
पुरस्कार :
श्री पंकज अडवाणी यांना
• 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार,
• 2006 मध्ये राजीव गांधी क्रीडारत्न पुरस्कार,
• 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार
• 2018 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.