
चालू घडामोडी 14, फेब्रुवारी 2025 | तीस्ता नदी | Teesta River

तीस्ता नदी
Teesta River
Subject : GS - भूगोल - नदी प्रणाली, आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
- तीस्ता नदी ही गंगा नदीची उपनदी आहे.
- तीस्ता नदीला "सिक्कीमची जीवनरेखा" म्हणून ओळखले जाते.
- दोन्ही बरोबर
- दोन्ही चूक
उत्तर : तीस्ता नदीला "सिक्कीमची जीवनरेखा" म्हणून ओळखले जाते. हा पर्याय बरोबर आहे.
- तीस्ता नदी ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे.
बातमी काय आहे ?
सिक्कीममधील मंगन जिल्ह्यातील संगकलांग येथे तीस्ता नदीवरील एक बेली पूल (Bailey Bridge) नुकताच कोसळला.
तीस्ता नदी (Teesta River) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• तिस्ता नदीचा उगम सिक्कीममधील त्सो ल्हामो सरोवरातून (Tso Lhamo Lake) होतो.
• तीस्ता नदी ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे.
• तीस्ता नदी ही भारत आणि बांग्लादेशमधून वाहते.
• तीस्ता नदी भारतातील सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून वाहते.
• तीस्ता नदीला "सिक्कीमची जीवनरेखा" म्हणून ओळखले जाते.
• तिस्ता नदी या प्रदेशात सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी पाण्याचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे, तिच्या मार्गावर अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्प आहेत.
• तीस्ता नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न हा भारत आणि बांग्लादेशमधील सर्वात वादग्रस्त मुद्द्यांपैकी एक आहे.
बेली ब्रिज म्हणजे काय ?
• बेली ब्रिज हा एक मॉड्युलर पुल आहे. या प्रकारच्या पुलाचे भाग आधीच तयार केलेले असतात जेणेकरून त्यांना कमीत कमी बांधकामाची आवश्यकता असते आणि आवश्यकतेनुसार ते पटकन एकत्र केले जाऊ शकतात.
बेली ब्रिजची निर्मिती कोणी केली ?
• डोनाल्ड कोलमन बेली या स्थापत्य अभियंत्याने या नव्या प्रकारच्या पुलाची सर्वात पहिल्यांदा निर्मिती केली.
• 1941 मध्ये त्यांनी आपल्या या रचनेचा पहिला आराखडा ब्रिटिश वॅार ऑफिस कडे सादर केला.
• दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात बेली ब्रिजच्या उपयोग मोलाचा ठरला.
• अवघ्या काही तासात पुल तयार करणे, युद्धादरम्यान पुल मोडून पुन्हा दुसऱ्या जागी उभा देखील करता येणे हे या पुलाचे वैशिष्ट्य आहे.
• या पुलाचे भाग वजनाने हलके असल्यामुळे त्यांना हवे तिथे हलवता येतात आणि त्यासाठी कोणत्याही अवजड वाहनाची गरज भासत नाही.
• हा पुल फक्त युद्धातच नाही तर अचानक आलेल्या आपत्तीमध्ये मदतकार्यासाठीही या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
• 1971 साली झालेले भारत-पाकिस्तान युद्ध तसेच 2021 मध्ये अरूणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या गावांमधील लोकांना वाचवण्यासाठी या पुलाचा वापर केला गेला.