
चालू घडामोडी 13, फेब्रुवारी 2025 | "डाळींमधील आत्मनिर्भरतेसाठी अभियान" म्हणजे काय ? | Mission for Atma Nirbharta in Pulses

"डाळींमधील आत्मनिर्भरतेसाठी अभियान" म्हणजे काय ?
Mission for Atma Nirbharta in Pulses
Subject : GS - अर्थशास्त्र - अर्थसंकल्प, कृषी, सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा.
1. केंद्रीय बजेट 2025-26 मध्ये डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी "डाळींमधील आत्मनिर्भरतेसाठी अभियान" या मोहिमेची घोषणा केली गेली.
2. तूर, उडीद आणि मसूरवर या तीन डाळीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
3. भारत हा जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि आयातदार देश आहे.
4. वरील सर्व बरोबर
उत्तर : वरील सर्व बरोबर
बातमी काय आहे ?
केंद्रीय बजेट 2025-26 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी "डाळींमधील आत्मनिर्भरतेसाठी अभियान" (Mission for Atma Nirbharta in Pulses) या मोहिमेची घोषणा केली.
"डाळींमधील आत्मनिर्भरतेसाठी अभियान" म्हणजे काय ?
• 2029 पर्यंत देशाची डाळींची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवरील अवलंबित्व संपवण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे.
• यासाठी 1000 करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
• केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की सरकार तूर, उडीद आणि मसूरवर विशेष लक्ष केंद्रित करून 6 वर्षांचे "डाळींमधील आत्मनिर्भरतेसाठी अभियान" सुरू करेल.
• केंद्रीय संस्था (NAFED आणि NCCF) पुढील 4 वर्षात शेतकऱ्यांकडून या तीन डाळी खरेदी करण्यास तयार असतील.
"डाळींमधील आत्मनिर्भरतेसाठी अभियान" कसे असेल ?
• या अभियानात हवामान अनुकूल बियाण्यांच्या विकास आणि व्यावसायिक उपलब्धतेवर भर दिला जाईल;
• प्रथिने सामग्री वाढवणे;
• उत्पादकता वाढवणे;
• कापणीनंतर साठवणूक आणि व्यवस्थापन सुधारणे
• शेतकऱ्यांना किफायतशीर किंमत सुनिश्चित करणे यावर भर दिला जाईल.
तुम्हाला माहिती आहे का ?
• भारत हा जगातील डाळींचा सर्वात मोठा उत्पादक (जागतिक उत्पादनाच्या 25%), ग्राहक (जागतिक वापराच्या 27%) आणि आयातदार देश (14%) आहे.
• भारत मोठ्या प्रमाणात कॅनडा, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, मोझांबिक, टांझानिया, सुदान आणि मलावी येथून डाळींची आयात करतो.
भारतात सर्वाधिक डाळी उत्पादक राज्य कोणती ?
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान हे देशातील तीन आघाडीचे डाळी उत्पादक राज्य आहेत.