
चालू घडामोडी 13, फेब्रुवारी 2025 | सरोजिनी नायडू | Sarojini Naidu

सरोजिनी नायडू
Sarojini Naidu
स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल, स्वातंत्र्यसेनानी, सुप्रसिद्ध कवयित्री, भारत कोकिळा सरोजिनी नायडू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती, इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) देशात राष्ट्रीय महिला दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात ?
1. सरोजिनी नायडू
2. ॲनी बेझंट
3. इंदिरा गांधी
4. विजया लक्ष्मी पंडित
उत्तर : सरोजिनी नायडू (Sarojini Naidu)
श्रीमती सरोजिनी नायडू यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
जन्म :
सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे झाला.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत योगदान :
असहकार चळवळ :
• 1920 मध्ये महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत सरोजिनी नायडू यांनी भाग घेतला आणि विविध स्वातंत्र्य कार्यात सहभागी झाल्यामुळे त्यांना अनेक वेळा अटक करण्यात आली.
मीठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व :
• 1930 मध्ये, गांधींजींनी सरोजिनी नायडू यांची भारतातील मीठ उत्पादनावरील ब्रिटिश मक्तेदारीविरुद्ध अहिंसक निषेध म्हणून सुरू केलेल्या मीठ सत्याग्रहाचे नेतृत्व करण्यासाठी निवड केली.
• 21 मे रोजी, सरोजिनी नायडू यांनी मुंबईच्या उत्तरेस सुमारे 150 मैल अंतरावर असलेल्या धारासना सॉल्ट वर्क्स 2,500 मोर्चेकऱ्यांचे नेतृत्व केले.
भारत छोडो आंदोलन :
• 1942 मध्ये, सरोजिनी नायडू यांना "भारत छोडो" चळवळीदरम्यान अटक करण्यात आली त्यांना 21 महिने तुरुंगवास भोगावा लागला.
परदेशात प्रवास आणि स्वातंत्र्यलढ्याबद्दल जागरूकता :
• भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी सरोजिनी नायडू यांनी अमेरिका आणि युनायटेड किंग्डमसह विविध देशांमध्ये प्रवास केला.
कैसर-ए -हिंद सुवर्णपदक (‘Kaisar-i-Hind’ Medal) :
• हैदराबाद येथील प्लेगच्या साथी दरम्यान त्यांनी जनतेला सर्वतोपरी मदत केली.
• त्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून सरोजिनी नायडू यांना कैसर-ए-हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले.
मृत्यू :
2 मार्च 1949 रोजी लखनऊ येथे सरोजिनी नायडू यांचे निधन झाले.
श्रीमती सरोजिनी नायडू यांबद्दल स्पर्धा परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न :
प्रश्न) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण होत्या ?
(सरळसेवा भरती, पोलीस भरती, MPSC, UPSC, CISF, SSC GD 2021)
• भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू या होत्या.
• 1925 मधील कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या.
नोट :
• पहिल्या महिला अध्यक्षा : 1917 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या अँनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.
• पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा : तर पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू या होत्या.
प्रश्न) भारताची कोकिळा म्हणून कोणास ओळखले जाते ?
(सरळसेवा भरती, पोलीस भरती, SSC GD 2024)
• सरोजिनी नायडू यांच्या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण असणाऱ्या, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या.
• त्यामुळे सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा (The Nightingale of India) म्हणून ओळखले जाते.
प्रश्न) स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?
(सरळसेवा भरती, पोलीस भरती, MPSC, TET, SSC GD)
• सरोजिनी नायडू या स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या.
• 1947 मध्ये त्यांनी संयुक्त प्रांत म्हणजे आत्ताच्या उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल म्हणून जबाबदारी स्वीकारली.
प्रश्न) देशात राष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
• भारतात 13 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात.
• महिलांच्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यलढ्यातील सरोजिनी नायडू यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ, 13 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
नोट : 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो.