
चालू घडामोडी 15, फेब्रुवारी 2025 | भ्रष्टाचाराच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा ? | Corruption Perceptions Index

भ्रष्टाचाराच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा ?
Corruption Perceptions Index
Subject : GS - जागतिक संघटना - निर्देशांक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच प्रकाशित झालेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?
1. 102
2. 96
3. 74
4. 58
उत्तर : 96
बातमी काय आहे ?
• भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) 2024 मध्ये भारताचा क्रमांक 180 पैकी 96 वा आहे.
भारत आणि भारताच्या शेजारी देशांमध्ये भ्रष्टाचार धारणा निर्देशांक :
• चीनचा क्रमांक 76 वा
• भारताचा क्रमांक 96 वा
• श्रीलंका 121 वा,
• पाकिस्तान 135 वा,
• बांगलादेश 149 वा
नोट : देशाचा क्रमांक जेवढा जास्त तेवढा तो देश भ्रष्ट.
उदाहरणार्थ : भारत हा पाकिस्तान पेक्षा कमी भ्रष्ट आहे तर भारत हा चीन पेक्षा जास्त भ्रष्ट आहे.
भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) 2024 अनुसार सर्वात जास्त भ्रष्टाचार असणारे देश कोणते ?
• या निर्देशांकात जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश सूदान (180 क्रमांक) आहे.
• सूदान देशानंतर, सोमालिया (179 क्रमांक), व्हेनेझुएला (178 क्रमांक) हे भ्रष्टाचारी देश आहेत.
भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (CPI) 2024 अनुसार सर्वात कमी अत्यंत कमी भ्रष्टाचार असणारे देश कोणते ?
• सर्वात कमी ज्या देशात भ्रष्टाचार होतो अशा देशांमध्ये डेनमार्कने सलग 7व्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे.
• दुसऱ्या क्रमांकावर फिनंलँड , तिसऱ्या कम्रांकावर सिंगापूर, चौथ्या क्रमांकावर न्युझीलंड हे सर्वात कमी भ्रष्टाचार असणारे देश आहेत.
भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (Corruption Perceptions Index) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• 1995 पासून ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या गैर-सरकारी संस्थेद्वारे दरवर्षी भ्रष्टाचार धारणा निर्देशांक प्रकाशित केले जाते.
• भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात जगातील सर्वात भ्रष्ट आणि सर्वात इमानदार देशांची क्रमवारी जारी करण्यात येते.
• सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीच्या आधारे CPI 180 देशांची क्रमवारी सादर करते.
• देशांना 0 ते 100 या दरम्यान गुण दिले जातात. ज्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा देश हा इमानदार देश असतो तर सर्वात कमी गुण मिळवणारा देश हा भ्रष्ट देश जाहीर केला जातो.