
चालू घडामोडी 18, फेब्रुवारी 2025 | F- 35 लढाऊ विमान | F-35 Fighter Jet

F-35 लढाऊ विमान
F-35 Fighter Jet
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खालील पैकी कोणते लढाऊ विमान भारताला देण्याची ऑफर दिली आहे ?
1. राफेल
2. एफ 35
3. सुखोई
4. मिग
उत्तर : एफ 35 (F-35)
• राफेल हे फ्रान्स चे लढाऊ विमान आहे.
• सुखोई आणि मिग हे रशियाचे लढाऊ विमान आहे.
बातमी काय आहे ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारत - अमेरिकेदरम्यानच्या धोरणात्मक करारांची, नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.
• भारत आणि अमेरिकेने एकमेकांमधला लष्करी समन्वय वाढवण्याचं ठरवलं आहे.
• यादरम्यानच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी F-35 ही अमेरिकन फायटर जेट्स भारताला देण्याची ऑफर दिली.
F-35 ही अमेरिकन फायटर जेट्स बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• F- 35 लढाऊ विमान 'लॉकहीड मार्टिन' (Lockheed Martin) या अमेरिकन कंपनीने तयार केली आहे.
• ही अत्याधुनिक विमानं जगातली सर्वात भेदक, कोणत्याही परिस्थितीत टिकू शकणारी आणि सर्वाधिक कनेक्टेड असणारी जगातली फायटर जेट्स असल्याचं या कंपनीचे म्हणणे आहे.
• F- 35 लढाऊ विमान हे " पाचव्या पिढीतील लढाऊ विमान " (5th Generation Fighter Jets) आहेत.
पाचव्या पिढीतील लढाऊ विमान म्हणजे काय ?
5th Generation Fighter Jets?
• आजपर्यंत हे सर्वात प्रगत लढाऊ विमान आहेत.
• फिफ्थ जनरेशन' म्हणजे आजवरच्या फायटर जेट्सपेक्षा अत्याधुनिक,अचूक हल्ला करणारी, भेदक,वेगवान आणि आव्हानात्मक परिस्थितीतसुद्धा पायलटला टेक्नॉलॉजीच्या मदतीने फायदा मिळवून देणारी.
पाचव्या पिढीतील लढाऊ विमानात कोणती वैशिष्ट्ये असतात ?
• गुप्त तंत्रज्ञान (Stealth Technology) :
विमाने रडारवर कमीत कमी दिसते, ज्यामुळे ते शत्रूपासून वाचण्यास मदत करते.
• आधुनिक एव्हिओनिक्स (Advanced Avionics) :
यात अत्याधुनिक सेंसर आणि देखरेख प्रणाली आहेत, ज्यामुळे पायलट युद्धात चांगले निर्णय घेऊ शकतो.
• अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली (Advanced Weapon Systems) :
विविध प्रकारचे बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे लोड करण्याची आणि लक्ष्य करण्याची क्षमता आहे.
• कनेक्टिव्हिटी (Connectivity) :
हे विमान नेटवर्क-आधारित लढाऊ रणनीतींना प्रोत्साहन देण्यास सक्षम आहे, ज्यामुळे वैमानिकांना इतर विमाने आणि जमिनीवरील नियंत्रणासह माहितीची त्वरित देवाणघेवाण करता येते.
पाचव्या पिढीतील लढाऊ विमान कोण कोणत्या देशांकडे आहे ?
• फिफ्थ जनरेशन फाइटर जेट्स फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांकडेच आहे.
भारताकडे स्वतः चे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आहे का ?
नाही
• परंतु भारत स्वतः 'फिफ्थ जनरेशन फायटर जेट' विकसित करत आहे.
• एप्रिल 2024 मध्ये, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने स्वदेशी पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांच्या डिझाइन आणि विकासासाठीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली.
• या प्रकल्पाचे नाव आहे AMCA म्हणजेच 'ॲडव्हान्स्ड मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट' असं आहे.
• बंगळुरूमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'एरो इंडिया' (AERO India) शोमध्ये या विमानांची झलक दाखवण्यात आली.