
चालू घडामोडी 17, फेब्रुवारी 2025 | 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप | 38th National Games of India

38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप
38th National Games of India
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडक कोणत्या राज्याने जिंकला ?
1. महाराष्ट्र
2. उत्तराखंड
3. हरियाणा
4. पंजाब
उत्तर : महाराष्ट्र
बातमी काय ?
• 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभ उत्तराखंड येथे पार पडला.
• इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा रंगला.
38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त पदके कोणत्या राज्याने जिंकली ?
• महाराष्ट्राने सर्व राज्यांपैकी सर्वाधिक पदके जिंकली.
• महाराष्ट्राने स्पर्धेत एकूण 201 पदके जिंकली.
• यात 54 सुवर्णपद, 71 रौप्य पदक, 76 कांस्यपदक आहेत.
38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडक कोणत्या राज्याने जिंकला ?
• राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे व्दिशतक झळकविणार्या महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडकाने गौरविण्यात आले.
• केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या हस्ते महाराष्ट्राला राज्य विजेतेपदाचा करंडक देण्यात आला.
38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त पदके कोणी जिंकली ?
स्पर्धेत सर्वात जास्त पदके सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने (Services Sports Control Board) जिंकली.
1. सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने एकूण 121 पदके जिंकली. यात 68 सुवर्ण, 26 रौप्य आणि 27 कांस्य पदकांसह समावेश आहे.
2. महाराष्ट्राने 54 सुवर्ण, 71 रौप्य आणि 76 कांस्यपदकांसह दुसरे स्थान पटकावले.
3. हरियाणा 48 सुवर्ण, 47 रौप्य आणि 58 कांस्य पदके जिंकून तिसऱ्या स्थानावर राहिला
नोट :
• सर्व गटांमध्ये सर्वात जास्त पदके सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने जिंकली.
• तर राज्यांमध्ये सर्वात जास्त पदके महाराष्ट्राने जिंकली.
39 व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणते राज्य करणार आहे ?
मेघालय राज्याला 2026 मध्ये 39 व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्याचा मान मिळाला.
🧐🧐 तुम्हाला हे माहिती आहे का ?
• 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोठे करण्यात आले ?
• 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संकल्पना थीम काय आहे ?
• 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
सर्व टॅापीक याआधी कवर केला आहे.
38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबद्दल संपूर्ण माहिती साठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇