
चालू घडामोडी 17, फेब्रुवारी 2025 | आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके | Freedom Fighter Vasudev Balwant Phadke

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
Freedom Fighter Vasudev Balwant Phadke
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यतिथी दिनी मानवंदना 🙏💐💐
Subject : GS - महाराष्ट्राचा इतिहास, दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
(सरळसेवा भरती, पोलीस भरती, MPSC गट क 2021)
1. वि.दा. सावरकर
2. राजा राममोहन रॉय
3. वासुदेव बळवंत फडके
4. श्यामजी कृष्ण वर्मा
उत्तर : वासुदेव बळवंत फडके
जन्म , शिक्षण आणि नोकरी :
• वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला.
• त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले.
• त्यांचे माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले.
• कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे त्यंनी पुढील शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली.
वासुदेव बळवंत फडके हे कोणत्या खात्यात लिपिक होते ?
(MPSC combine 2018)
• वासुदेव बळवंत फडके हे सुरुवातीला रेल्वे खात्यात लिपिक होते.
• त्यानंतर त्यांनी लष्करी खात्यात लेखा विभागात कार्य केले.
• वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही, त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून दिली.
स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारला :
• पुढे पुण्यात क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची भेट क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्यासोबत झाल्यानंतर स्वातंत्र्यासाठी सशस्त्र सेना उभी करण्याची इच्छा त्यांच्या मनात प्रबळ झाली.
• रामोशी, कोळी, मांग, मुसलमान यांच्या मदतीने त्यांनी आदिवासींची फौज संघटित केली.
• स्वातंत्र्यासाठी, ब्रिटिश सरकारी खजिना लुटून पैसा उभारावयाचा आणि नव्या टोळ्या उभारून सरकारला हैराण करून सोडायचे, असा क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा विचार होता.
• 20 फेब्रुवारी 1879 ला क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि त्यांच्या फौजेने दरोडे टाकले.
• दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामारी गावाजवळ पहिला दरोडा घातला त्यात 3000 रुपये मिळविले.
‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ कोणाला म्हणतात ? आणि का ?
• क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यासाठी जो सशस्त्र लढा पुकारला, तो एकाकी होता.
• त्यांना पुरेसे अनुयायी लाभले नाहीत व शस्त्रसामग्रीही मिळाली नाही;
• तरीसुद्धा भारतात त्यांनी सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवली.
• ही सशस्त्र उठावाची चळवळ पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभर पसरली.
• म्हणून क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ म्हणतात.
• त्यांना भारतीय सशस्त्र बंडाचे जनक ('Father of the Indian Armed Rebellion') म्हणूनही ओळखले जाते.
फितुरीमुळे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके पकडले गेले :
• सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले आणि त्यांना पकडण्यासाठी मेजर डॅनियल ला मोहिमेवर धाडले.
• फितुरीमुळे ब्रिटिशांना क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा ठावठिकाणा मिळाला.
• 23 जुलै 1879 ला विजापूर जवळील देवर नावडगी या गावच्या बाहेर बौद्ध विहार मध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली.
• पुणे येथे त्यांच्यावर खटला चालविण्यात आला.
• ग. वा. जोशी (सार्वजनिक काका) यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले.
• उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले.
ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
(MPSC STI 2013)
• क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेपेची – काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली.
• 3 जानेवारी 1880 रोजी तेहरान बोटीने त्यांना यमन देशातील एडन या ठिकाणी पाठवण्यात आले.
• ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या कारागृहात ठेवले होते.
मृत्यू :
• तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची प्रकृती बिघडली.
• 17 फेब्रुवारी 1883 रोजी एडनच्या कारागृहात त्यांचे निधन झाले.