
चालू घडामोडी 18, फेब्रुवारी 2025 | स्वामी रामकृष्ण परमहंस जयंती | Birth Anniversary of Swami Ramakrishna Paramhansa

स्वामी रामकृष्ण परमहंस जयंती
Birth Anniversary of Swami Ramakrishna Paramhansa
स्वामी रामकृष्ण परमहंस यांना जयंती दिनी आदरांजली 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय आहे ?
(SSC CHSL 2023)
1. नरेंद्र नाथ दत्त
2. मुकुंद लाल घोष
3. गदाधर चट्टोपाध्याय
4. वेंकटरमण अय्यर
उत्तर : गदाधर चट्टोपाध्याय
स्वामी रामकृष्ण परमहंस यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 रोजी बंगालमधील कामारपुकुर या खेड्यात झाला.
• त्यांचे मूळ नाव गदाधर चट्टोपाध्याय (Gadadhar Chattopadhyaya) होते.
• त्यांनी तांत्रिक, भक्ती, वैष्णव आणि अद्वैत वेदांत यासारख्या विविध आध्यात्मिक परंपरांचे पालन केले.
• स्वामी रामकृष्ण परमहंस हे माँ कालीचे भक्त होते.
• स्वामी रामकृष्ण परमहंस दक्षिणेश्वर कालीमातेच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करत असे आणि माँ कालीची पुजा करत असे.
• स्वामी रामकृष्ण परमहंस " दक्षिणेश्वराचे संत " म्हणून प्रसिद्ध आहे.
• स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या शिकवणी प्रेम, भक्ती आणि आत्म-साक्षात्कारावर केंद्रित होत्या.
• त्यांच्यासाठी धर्म हा एक साधन होता जो अंतिम सत्याकडे नेणारा होता आणि लोकांना वेगवेगळ्या धार्मिक परंपरांचा आदर करण्यास आणि त्याबद्दल शिकण्यास शिकवत असे.
• स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा असा विश्वास होता की मानवतेची सेवा करणे हे देवाची उपासना करण्यासारखे आहे.
स्वामी विवेकानंद यांचे गुरू कोण होते ?
• स्वामी रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरू होते.
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?
• स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनची स्थापना केली.