
चालू घडामोडी 19, फेब्रुवारी 2025 | छत्रपती शिवाजी महाराज जयंती | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

छत्रपती शिवाजी महाराज जयंती
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
शूर, पराक्रमी, हुशार, दयाळू, पर्यावरण प्रेमी, जनतेचा राजा म्हणून सर्वांच्या मनात राज्य करणाऱ्या माझ्या राजास जयंती दिनी त्रिवार मानाचा मुजरा 🙏💐💐
Subject : GS - इतिहास- मराठ्यांचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
(सरळसेवा भरती, तलाठी भरती, जालना पोलीस, भंडारा पोलीस 2021, रत्नागिरी पोलीस 2021, ...)
• छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर (पुणे जिल्हा) झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ ---- ठिकाणी आहे.
(सोलापूर ग्रामीण पोलीस चालक 2021)
• छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे आहे.
• सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान आणि माहेर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या मंदिरात घेतली ?
कोणत्या ठिकाणी रायरेश्वर मंदिर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती ?
(दिल्ली पोलीस 2020)
• शिवरायांनी वयाच्या 16 व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली.
• रायरेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे.
• हिंदवी स्वराज्य स्थापनेचे उगमस्थान म्हणून रायरेश्वराला विशेष महत्त्व आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?
(सरळसेवा भरती, तलाठी भरती, चंद्रपूर पोलीस 2023, नवी मुंबई पोलीस SRPF 2021, ...)
• छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व प्रथम तोरणा किल्ला जिंकला.
• हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे.
• तोरणा किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक केव्हा झाला ?
(सरळसेवा भरती, नांदेड पोलीस 2023, नवी मुंबई पोलीस 2021, ....)
• स्वराजाची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक सोहळा पार पडला.
• मुख्य पुरोहित गागाभट्ट यांनी महाराजांचा शिवछत्रपती म्हणून उच्चार करत महाराजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवली आणि स्वराज्याच्या धन्याचा मोठ्या दिमाखात राज्याभिषेक सोहळा पार पडला.
• स्वराज्याची नाणी छापण्यात आली यांमध्ये सोन्याचा हून तर तांब्याची शिवराई ही खास नाणी होती.
• तत्कालीन राजमुद्रेवर संस्कृत भाषेत
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता॥
साहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥

असे लिहिले आहे.
याचा अर्थ "शहाजींचा पुत्र शिवाजी याचे प्रतिपदेच्या चंद्रकोर प्रमाणे वाढत जाणारे हे राज्य लोकांच्या कल्याणासाठी आहे." असा होतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी कोणता इंग्रज वकील उपस्थित होता ?
(सरळसेवा भरती, ठाणे ग्रामीण पोलीस 2023,..... )
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सिडेन हा इंग्रज वकील उपस्थित होता.
• त्यांनी संपूर्ण सोहळ्याची अतिशय विस्तृत व सखोल माहिती आपल्या डायरीत नमूद केली आहे.
• हा इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा मानला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी अर्थमंत्री कोण होते ?
(हरियाणा सचिव 2021, सरळसेवा भरती, भंडारा पोलीस 2023,..... )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अर्थमंत्री (वित्त मंत्री) यांस अमात्य म्हणतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात ?
( सरळसेवा भरती, भंडारा पोलीस 2023,..... )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधानांना पेशवा म्हणतात.
