
चालू घडामोडी 19, फेब्रुवारी 2025 | NCST 22वा स्थापना दिन | National Commission for Scheduled Tribes Foundation Day

NCST 22वा स्थापना दिन
National Commission for Scheduled Tribes Foundation Day
Subject : GS - राज्यशास्त्र , घटनात्मक संस्था, घटनादुरुस्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा 22 वा स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला ?
1. 22 फेब्रुवारी
2. 19 फेब्रुवारी
3. 12 फेब्रुवारी
4. 8 फेब्रुवारी
उत्तर : 19 फेब्रुवारी
अनुसूचित जमाती म्हणजे नेमकं काय ?
• 'अनुसूचित जमाती' हा शब्द प्रथम भारतीय संविधानात आला.
• राष्ट्रीय अनुसूचित जमाती म्हणजे भारतातील असा आदिवासी समुदाय, ज्यांना संविधानाने मान्यता दिली आहे.
• अनुच्छेद 366(25) मध्ये अनुसूचित जमातींची व्याख्या "अशा जमाती किंवा आदिवासी समुदाय किंवा आदिवासी समुदायांचे भाग किंवा गट ज्यांना या संविधानाच्या उद्देशाने अनुसूचित जमाती म्हणून कलम 342 अंतर्गत अनुसूचित जमाती मानले जाते" अशी केली आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग 2004 मध्ये अस्तित्वात आला.
• पूर्वी अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या राष्ट्रीय आयोग अशी एकच संस्था होती.
• 89 व्या घटनादुरुस्ती कायदा, 2003 नुसार खालीलप्रमाणे दोन स्वतंत्र आयोगांनी स्थापना करण्यात आली.
- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग (NCSC), आणि
- राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST)
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगा मध्ये किती सदस्य असतात ? त्यांची नियुक्ती कोण करतं ?
• राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगा मध्ये 5 सदस्य असतात.
• यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 इतर सदस्य असतात.
• यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?
नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे मुख्यालय आहे.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची कार्ये कोणती ?
• या संविधानाअंतर्गत किंवा सध्या लागू असलेल्या इतर कोणत्याही कायद्याअंतर्गत किंवा सरकारच्या कोणत्याही आदेशानुसार अनुसूचित जमातींसाठी प्रदान केलेल्या सुरक्षा उपायांशी संबंधित सर्व बाबींची चौकशी आणि देखरेख करणे आणि अशा सुरक्षा उपायांच्या कार्याचे मूल्यांकन करणे;
• अनुसूचित जमातींच्या हक्कांपासून वंचित राहण्याच्या आणि त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दलच्या विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे;
• अनुसूचित जमातींच्या सामाजिक-आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होणे आणि सल्ला देणे आणि संघराज्य आणि कोणत्याही राज्यात त्यांच्या विकासाच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे;
• दरवर्षी आणि आयोगाला योग्य वाटेल अशा इतर वेळी, त्या सुरक्षा उपायांच्या कार्यप्रणालीचे अहवाल राष्ट्रपतींना सादर करणे;
• अनुसूचित जमातींच्या संरक्षण, कल्याण आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी त्या सुरक्षा उपायांच्या आणि इतर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संघ किंवा कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल अशा अहवालांमध्ये शिफारस करणे;
• अनुसूचित जमातींचे संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती या संदर्भात राष्ट्रपतींनी निर्देश दिल्याप्रमाणे इतर कार्ये पार पाडणे.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग वार्षिक अहवाल कोणाकडे सादर करतात ?
• राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रपतींकडे वार्षिक अहवाल (Annual Report) सादर करतात.
• त्यानंतर हा अहवाल राष्ट्रपती संसदेसमोर ठेवतात.
• राष्ट्रपती राज्य सरकारशी संबंधित राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा अहवाल संबंधित राज्यपालांना देखील पाठवतात.
• राज्यपाल ते राज्य विधिमंडळासमोर सादर करतात.