
चालू घडामोडी 20, फेब्रुवारी 2025 | देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण ? | Who is the new CEC of India ?

देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण ?
Who is the new CEC of India ?
Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, 19 फेब्रुवारी 2025 रोजी, देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?
1. श्री के संजय मूर्ती
2. श्री ज्ञानेश कुमार
3. श्री गिरीशचंद्र मुर्मू
4. श्री धनंजय चंद्रचूड
उत्तर : श्री ज्ञानेश कुमार (Shri Gyanesh Kumar)

बातमी काय आहे ?
• देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून, श्री ज्ञानेश कुमार यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी पदभार स्वीकारला.
• श्री ज्ञानेश कुमार हे भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner)आहेत.
• श्री ज्ञानेश कुमार हे केरला केडरमधील 1988 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहे.
भारतीय निवडणूक आयोगा संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
Election Commission of India (ECI)
भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
• 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतीय निवडणूक आयोगाचे सचिवालय कोठे आहे ?
भारतीय निवडणूक आयोगाचे सचिवालय नवी दिल्ली येथे आहे.
राज्यघटनेत कलम 324 ते 329 कशाशी संबंधित आहे ?
• भारतीय संविधानाचा भाग XV निवडणुकांची संबंधित आहे.
• राज्यघटनेतील कलम 324 ते 329 भारतीय निवडणूक आयोग आणि सदस्य यांची पात्रता, अधिकार, कार्यकाळ, कार्य इत्यादींशी संबंधित आहे.
भारतीय निवडणूक आयोगा कोणत्या संस्था/पदांसाठी निवडणूका घेतात ?
संविधानाच्या कलम 324 अनुसार भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुकांची देखरेख, दिशा आणि नियंत्रण याचे अधिकार भारतीय निवडणूक आयोगाकडे असतील.
भारतीय निवडणूक आयोगाची रचना, शपथ, कार्यकाळ :
- भारतीय निवडणूक आयोगामध्ये एक प्रमुख निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात.
- नियुक्ती : त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.
- कालावधी : त्यांचा कार्यालयीन कालावधी 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयापर्यंत, यांपैकी जे आधी असेल ते निश्चित आहे.
- दर्जा, पगार आणि भत्ते : त्यांचा दर्जा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समान असतो. आणि त्याप्रमाणेच पगार व भत्ते त्यांना असतात.