
चालू घडामोडी 20, फेब्रुवारी 2025 | मृदा आरोग्य कार्ड योजना म्हणजे काय ? | Soil Health Card Scheme

मृदा आरोग्य कार्ड योजना म्हणजे काय ?
Soil Health Card Scheme
Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मृदा आरोग्य कार्ड योजना (Soil Health Card Scheme) केव्हा सुरू करण्यात आली ?
1. 2025
2. 2020
3. 2015
4. 2010
उत्तर : 2015
बातमी काय आहे ?
नुकतेच मृदा आरोग्य कार्ड योजनेला 10 वर्ष पूर्ण झाले.
मृदा आरोग्य कार्ड योजना केव्हा सुरू करण्यात आली ?
• 19 फेब्रुवारी 2015 रोजी, राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथे देशव्यापी ' राष्ट्रीय मृदा आरोग्य कार्ड ' योजना सुरू करण्यात आली.
• या योजनेचा मुख्य उद्देश देशभरातील शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड प्रदान करण्यात राज्यांना मदत करणे हे आहे.
• या योजनेची संकल्पना निरोगी पृथ्वी, हिरवीगार शेते असा आहे.
मृदा आरोग्य कार्ड योजना काय आहे ?
• या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अभ्यास करून मातीच्या पोषक स्थितीबद्दल माहिती प्रदान करणे हे आहे.
• मातीच्या परीक्षणामुळे (Soil Testing) जमिनीची सुपीकता समजते.
• जमिनीचा कस, मातीमध्ये कोणते पोषकद्रव्ये आहेत, कोण - कोणत्या घटकांची कमतरता आहे, कोणते खत वापरावे, जमिनीचा पोत कसा सुधारावा यांची माहिती दिली जाते.
• या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत जेणेकरून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल यासंदर्भात योग्य माहिती तसेच मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळते.
मृदा आरोग्य कार्ड योजनेची वैशिष्ट्ये :
• मृदा आरोग्य कार्ड : शेतकऱ्यांना त्यांच्या मातीच्या पोषक स्थितीबद्दल माहिती प्रदान करते आणि मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोषक तत्वांच्या योग्य मात्रेबद्दल शिफारसी देते.
• कार्डमध्ये N,P,K, S (मॅक्रो-पोषक घटक); Zn, Fe, Cu, Mn, Bo (सूक्ष्म-पोषक घटक); आणि pH (आम्लता किंवा मूलभूतता), EC (विद्युत चालकता) आणि OC (सेंद्रिय कार्बन) या 12 पॅरामीटर्सच्या संदर्भात मातीची स्थिती समाविष्ट आहे.
• ग्रामीण स्तरावर, माती परीक्षण प्रयोगशाळा (Village Level Soil Testing Labs) स्थापन करण्यास मदत करणे.