
चालू घडामोडी 21, फेब्रुवारी 2025 | आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन | International Mother Language Day

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
International Mother Language Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरी केला जातो ?
1. 1 फेब्रुवारी
2. 13 फेब्रुवारी
3. 18 फेब्रुवारी
4. 21 फेब्रुवारी
उत्तर : 21 फेब्रुवारी
बातमी काय आहे ?
• 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो.
• 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन का साजरी करण्यात येतो ?
• जगातील विविध भाषा आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मातृभाषांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन' साजरा केला जातो.
• या दिवसाचा उद्देश भाषांचे जतन करणे, बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि भाषिक विविधतेबद्दल जागरूकता पसरवणे हे आहे.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2025 ची संकल्पना (थीम) कोणती ?
"आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचा रौप्य महोत्सवी उत्सव" ही आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2025 ची संकल्पना (थीम) आहे.
" Silver Jubilee Celebration of International Mother Language Day "
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी रोजीच का साजरी करतात ?
• पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांग्लादेश असे दोन भाग होते.
• तत्कालीन पाकिस्तान सरकारने भाषा धोरण लागू करून पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली होती.
• पाकिस्तान सरकारच्या या धोरणाच्या विरोधात ढाका (आजच्या बांग्लादेशाची राजधानी) विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले.
• विद्यापीठातील आंदोलनावर पोलिसांनी 21 फेब्रुवारी 1952 रोजी गोळीबार केला होता.
• आंदोलनाच्या परिणामी पाकिस्तान सरकारला नमतं घ्यावं लागले आणि बंगाली भाषेलाही मान्यता दिली गेली.
• या बलिदानाच्या स्मरणार्थ 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरी करण्यात येतो.
पहिला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• 1999 मध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा केली.
• 21 फेब्रुवारी 2000 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जगभरात साजरा केला गेला.