मिझोरम व अरुणाचल प्रदेश राज्यांचा राज्य स्थापना दिवस
Statehood Day of Mizoram and Arunachal Pradesh
Subject : GS - दिनविशेष, भूगोल, राज्यशास्त्र - राज्य निर्मिती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मिझोराम राज्याला राज्याचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला ?
1. 1947
2. 1965
3. 1987
4. 1992
उत्तर : 1987
बातमी काय आहे ?
• महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे अरुणाचल प्रदेश व मिझोराम राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
• ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांची भाषा, लोककला, जीवनशैली यांचा सर्वांना परिचय होत असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
मिझोराम राज्याला राज्याचा दर्जा केव्हा मिळाला ?
• 20 फेब्रुवारी 1987 रोजी भारतीय संविधानाच्या 53 व्या दुरुस्ती द्वारे मिझोराम हे भारतीय संघराज्याचे 23वे राज्य बनले.
• संविधानाच्या सहाव्या अनुसूचीनुसार मिझोरामला "आदिवासी क्षेत्र" म्हणून नियुक्त केले आहे.
(नोट : भारतीय संविधानाच्या कलम 244 मध्ये 'अनुसूचित क्षेत्र' आणि 'आदिवासी क्षेत्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नियुक्त क्षेत्रांसाठी विशेष प्रशासकीय प्रणालीची तरतूद आहे.)
मिझोराम राज्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• मिझोराम राज्याची राजधानी ऐझॉल (Aizawl) आहे.
• मिझोराम राज्याला लागून बांग्लादेश आणि म्यानमार या देशांची सीमा आहे.
• मिझोराम राज्याला लागून त्रिपुरा, आसाम आणि मणिपूर या राज्यांची सीमा आहे.
• मिझोराम हा टेकड्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे.
• मिझोराम राज्याचा राज्य प्राणी हिमालयन सीरो (Himalayan Sero) हा आहे.
• मिझोराम राज्याचा राज्य पक्षी वावु (Mrs. Hume's Pheasant) हा आहे.
अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा केव्हा मिळाला ?
भारतीय संविधानातील 55व्या दुरुस्तीद्वारे, अरुणाचल प्रदेश राज्य कायद्यानुसार 20 फेब्रुवारी 1987 रोजी, अरुणाचल प्रदेश भारताचे 24वे राज्य बनले.
अरुणाचल प्रदेश राज्या बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी ईटानगर आहे.
• अरुणाचल प्रदेश राज्याला लागून भूतान, चीन आणि म्यानमार या देशांची सीमा आहे.
• अरुणाचल प्रदेश राज्याला लागून आसाम आणि नागालँड या राज्यांची सीमा आहे.
• भारतात सर्व प्रथम सूर्य अरुणाचल प्रदेश या राज्यात उगवतो, म्हणून यास ‘अरुणाचल’ हे नाव मिळाले आहे.
• अरुणाचल प्रदेश राज्याचा राज्य प्राणी मिथुन किंवा गयाल (MIthun / Gayal) आहे.
• अरुणाचल प्रदेश राज्याचा राज्य पक्षी ग्रेट हॉर्नबिल (Great Hornbill) आहे.
• तर अरुणाचल प्रदेश राज्याचे राज्य फूल फॉक्सटेल ऑर्किड (Foxtail Orchid) आहे , ज्याला स्थानिक भाषेत कोपू फूल म्हणतात.

ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या राज्यातून भारतात प्रवेश करते ?
(SSC MTS 2022)
• ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमधील पवित्र कैलास पर्वताजवळील मानसरोव सरोवराजवळील चेमायुंगडुंग हिमनदीतून उगम पावते.
• अरुणाचल प्रदेश राज्यातून ती भारतात प्रवेश करते.
• अरुणाचल प्रदेशात ब्रह्मपुत्रा नदीला सियांग किंवा दिहांग म्हणतात.