
चालू घडामोडी 22, फेब्रुवारी 2025 | दिल्ली चे मुख्यमंत्री कोण ? | Who has become the Chief Minister of Delhi ?

दिल्ली चे मुख्यमंत्री कोण ?
Who has become the Chief Minister of Delhi ?
Subject : GS - नियुक्ती, राज्यशास्त्र - निवडणूक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली ?
1. श्रीमती रेखा गुप्ता
2. श्री राजनाथ सिंग
3. श्रीमती स्मृती इराणी
4. श्री अरविंद केजरीवाल
उत्तर : श्रीमती रेखा गुप्ता
बातमी काय आहे ?
• श्रीमती रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
• श्रीमती रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या 9व्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने सरकार स्थापन केले ?
• 2025 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (भाजपा) पक्षाने सरकार स्थापन केले.
• दिल्ली विधानसभेची एकूण सदस्य संख्या 70 आहे.
• 2025 च्या निवडणुकीत भाजपाने 48 जागा जिंकून सरकार स्थापन केले.
• तर आम आदमी पार्टीने 22 जागा जिंकल्या.
श्रीमती रेखा गुप्ता या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहे ?
• श्रीमती रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहे.
• श्रीमती रेखा गुप्ता भारताच्या 18व्या महिला मुख्यमंत्री बनल्या.
दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश यादव होते.
दिल्ली च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?
सुशमा स्वराज या दिल्ली च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
दिल्लीच्या सर्वात जास्त काळ राहिलेले /राहिलेल्या मुख्यमंत्री कोण ?
काँग्रेस पक्षाच्या शीला दीक्षित या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ राहिलेल्या मुख्यमंत्री आहे.