
चालू घडामोडी 25, फेब्रुवारी 2025 | कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा स्थापना दिन | Foundation Day of the Employees’ State Insurance Corporation

कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा स्थापना दिन
Foundation Day of the Employees’ State Insurance Corporation
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र - वैधानिक संस्था
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) कर्मचारी राज्य विमा महामंडळाची (ESIC) स्थापना केव्हा करण्यात आली ?
1. 1952
2. 1965
3. 1974
4. 1988
उत्तर : 1952
बातमी काय आहे ?
केंद्रीय कामगार व रोजगार आणि युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी, 24 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे दोन दिवसीय सामाजिक न्यायावरील प्रादेशिक संवाद तसेच कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या 74 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या 74 व्या स्थापना दिना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
Employees’ State Insurance Corporation :
• आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) महासंचालक श्री. गिल्बर्ट एफ. हौंगबो (Mr. Gilbert F. Houngbo) कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
• उद्घाटन सत्रात ई-श्रम मोबाईल ॲप्लिकेशन आणि प्रकाशने यासारख्या प्रमुख उपक्रमांचे अनावरण करण्यात आले.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 24 फेब्रुवारी 1952 रोजी कर्मचारी राज्य विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली.
• हे महामंडळ कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 (Employees' State Insurance Act, 1948) अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे.
• हे महामंडळ भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या ( Ministry of Labour and Employment) अंतर्गत काम करते.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ काय काम करते ?
• कर्मचारी राज्य विमा महामंडळ भारतातील सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावते.
• हे महामंडळ कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय सेवा, प्रसूती लाभ आणि आर्थिक संरक्षण प्रदान करत आहे.