
चालू घडामोडी 24, फेब्रुवारी 2025 | 15वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा | 15th All India Police Commando Competition

15 वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा
15th All India Police Commando Competition
Subject : GS - पुरस्कार, संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 15 वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणी पटकावला ?
1. महाराष्ट्र पोलीस
2. केंद्रीय राखीव पोलीस दल
3. सीमा सुरक्षा दल
4. भारत तिबेट सीमा पोलीस दल
उत्तर : महाराष्ट्र पोलीस
15 वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली ?
• 15 वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) गुरुग्राम ग्रुप सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती.
• या वर्षी, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (Central Armed Police Forces) आणि राज्य पोलिस दलातील (State Police) ४४ राजपत्रित अधिकाऱ्यांसह ६६३ कर्मचाऱ्यांच्या २१ संघांनी स्पर्धेत भाग घेतला.
15 वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणी पटकावला ?
- महाराष्ट्र पोलीसांनी देशातील सर्वोत्तम कमांडोंमध्ये आयोजित 15 वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा (AIPCC) जिंकत प्रथम क्रमांक पटकावला.

- (BSF) सीमा सुरक्षा दला ने दुसरा क्रमांक पटकावला.

- (ITBP) भारत तिबेट सीमा पोलीस दला ने तिसरा क्रमांक पटकावला.

स्वतंत्र स्नायपर स्पर्धेत सुवर्णपदक, रौप्य आणि कांस्यपदक कोणी जिंकले ?
- NSG ने सुवर्णपदक जिंकले,
- महाराष्ट्राने रौप्य पदक जिंकले,
- तर राजस्थानने कांस्यपदक जिंकले.