
चालू घडामोडी 24, फेब्रुवारी 2025 | Majorana 1 म्हणजे काय ? | What is Majorana 1 ?

Majorana 1 म्हणजे काय ?
What is Majorana 1 ?
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - Computer
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मजोराना 1, (Majorana 1) ही क्वांटम कॉम्प्युटिंग चिप खालील पैकी कोणत्या कंपनीने तयार केली आहे ?
1. गुगल (Google)
2. नासा (NASA)
3. ॲपल (Apple)
4. माइक्रोसॉफ़्ट (Microsoft)
उत्तर : माइक्रोसॉफ़्ट (Microsoft)
बातमी काय आहे ?
अलिकडेच, मायक्रोसॉफ्टने, मजोराना 1, (Majorana 1) ही अभूतपूर्व क्वांटम कॉम्प्युटिंग चिप, सादर केली आहे, जी क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण झेप आहे.
कोणी बनवली मजोराना 1 क्वांटम चिप ?
• अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने एक नवीन क्वांटम चिप मजोराना 1 (Majorana 1) लाँच केली आहे.
• ही चिप व्यावहारिक क्वांटम संगणनाच्या विकासाला गती देऊ शकते.
• कंपनीचा दावा आहे की हे जगातील पहिले क्वांटम प्रोसेसिंग युनिट (QPU) आहे जे टोपोलॉजिकल कोरवर बांधले गेले आहे.
• त्याला त्याची शक्ती पदार्थाच्या नव्याने सापडलेल्या अवस्थेतून मिळते.
टोपोकंडक्टर (Topoconductors) म्हणजे नेमकं काय ?
Majorana 1 चिप एवढी विशेष का आहे ?
• मायक्रोसॉफ्टने तयार केलेल्या मजोराना 1 चिप मध्ये पहिल्यांदाच वापरल्या जाणाऱ्या टोपोकंडक्टरचा वापर (टोपोलॉजिकल सुपरकंडक्टर) केला आहे.
• टोपोकंडक्टर हा पदार्थाचा एक विशेष वर्ग आहे जो पदार्थाची पूर्णपणे नवीन अवस्था निर्माण करू शकतो.
• घन, द्रव किंवा वायू नसून टोपोलॉजिकल ही एक अवस्था आहे.
• ही चिप इंडियम आर्सेनाइड (एक अर्धवाहक) आणि ॲल्युमिनियम (एक सुपरकंडक्टर) पासून बनवली जाते.
• ज्याप्रमाणे सेमीकंडक्टर्सनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स सक्षम केले, त्याचप्रमाणे टोपोकंडक्टर्स स्केलेबल क्वांटम सिस्टमसाठी मार्ग मोकळा करतात, ज्यामुळे जटिल औद्योगिक आणि सामाजिक आव्हाने सोडवण्यासाठी दशलक्ष क्यूबिट्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते.
क्वांटम चीप म्हणजे काय ?
• आपण कॉम्प्युटरमध्ये जे काही टाईप करतो जसे की शब्द, आकडे यांसारख्या सगळ्याचं कॉम्प्युटरच्या या बिट्सच्या भाषेत रूपांतर केलं जातं. आणि स्टोअर केलं जातं. यालाच म्हणतात कॉम्प्युटरची बायनरी सिस्टीम.
• या बिट्सची भाषा असते 0 आणि 1 ची.
• रेगुलर चीप मध्ये BITS झिरो किंवा वन असतात. म्हणजे एक तर झिरो असेल नाही तर वन असेल.
• परंतु क्युबिट हा 0 किंवा 1 किंवा एकाच वेळी 0 आणि 1 दोन्ही असू शकतो.
• क्वांटम कॉम्प्युटरमधले हे क्युबिट्स एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात. त्यामुळे कमी क्युबिट्समध्ये भरपूर माहिती साठवली जाऊ शकते. आणि ती माहिती अधिक वेगाने प्रोसेस केली जाऊ शकते.
नोट :
• क्वांटम कॉम्प्युटिंगसाठीची मजोराना 1, (Majorana 1) ही माइक्रोसॉफ़्ट (Microsoft) या कंपनीने बनवली आहे.
• तर विलो (Willow) नावाची चिप गुगल (Google) या कंपनीने बनवली आहे.