
चालू घडामोडी 27, फेब्रुवारी 2025 | चंद्रशेखर आझाद | Chandrashekhar Azad

चंद्रशेखर आझाद
Chandrashekhar Azad
भारत मातेचे थोर सुपुत्र, चंद्रशेखर आझाद यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन 🙏💐💐
Subject : GS - दिनविशेष, इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास, क्रांतीकारक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली ?
(सरळसेवा भरती, PSI 2012, MPSC 2022)
1. गदर
2. नवभारत
3. नवजीवन सैनिक संघ
4. हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
उत्तर : हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला ?
• 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशातील भावरा या गावात चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला.
• त्यांचे मूळ नाव चंद्रशेखर तिवारी असे होते.
चंद्रशेखर तिवारी, चंद्रशेखर आझाद कसे बनले ?
• 1921 मध्ये महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत चंद्रशेखर आझाद केवळ 15 वर्षांचे असताना सामील झाले.
• यादरम्यान त्यांना अटक करण्यात आली.
• मॅजिस्ट्रेटसमोर हजर केल्यावर त्यांनी आपले नाव "आझाद" आपल्या वडिलांचे नाव "स्वातंत्र्य" आणि आपले निवासस्थान "तुरंग" असे सांगितले.
• आणि तेव्हा पासून त्यांना चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखले जाऊ लागले.
कोणत्या भारतीय क्रांतिकारकाला "बलराज" या टोपणनावाने ओळखले जाते ?
• भारतीय क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांना "बलराज" या टोपणनावाने ओळखले जाते.
• हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे कमांडर इन चीफ म्हणून जारी केलेल्या पत्रकांवर स्वाक्षरी करताना चंद्रशेखर आझाद अनेकदा 'बलराज' हे टोपणनाव वापरत असत.
हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन आणि काकोरी कट :
• महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर ते क्रांतिकारी चळवळीकडे वळले गेले.
• चंद्रशेखर आझाद, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सामील झाले.
काकोरी कट (Kakori Train Robbery) :
• क्रांतिकारी कारवायांसाठी गोळा होणारा निधी बहुतेक वेळा सरकारी मालमत्तेच्या दरोड्यांमधून गोळा केला जात असे.
• त्याचप्रमाणे, 1925 मध्ये लखनौमधील काकोरीजवळील काकोरी ट्रेन दरोडा हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ने घडवून आणला.
• ही योजना चंद्रशेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि मन्मथनाथ गुप्ता यांनी राबवली.

हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना कोणी केली ?
• हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना 1928 मध्ये नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव थापर, अशफाकुल्ला खान आणि जोगेशचंद्र चॅटर्जी यांनी केली.
• हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे पुनर्गठन करून हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे करण्यात आले.
जे. पी. साँडर्सचा वध :
• सायमन कमिशन लाहोरमध्ये आल्याच्या निषेधार्थ "सायमन गो बॅक" असा नारा देत लाला लजपतराय यांनी 30 ऑक्टोबर 1928 रोजी अहिंसक निदर्शनाचे नेतृत्व केले.
• पोलिसांच्या लाठीहल्ल्यात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला.
• त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून 1928 मध्ये (लाहोर कट प्रकरण) पोलिस अधिकारी जे. पी. साँडर्स याला भगतसिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांनी गोळ्या घालून ठार केले.
चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू कसा झाला ?
• चंद्रशेखर आझाद 27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबाद येथे आल्फ्रेड पार्कात क्रांतिकारीला भेटण्यासाठी गेले होते.
• फितुरी मुळे ब्रिटिश पोलिसांना ही बातमी समजली.
• ब्रिटिश पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी पार्कांच्या भोवती वेढा घातला.
• या घटनेत पोलिसांमध्ये आणि त्यांच्यात गोळीबार झाला.
• चंद्रशेखर आझाद यांनी तीन पोलिसांना ठार केले.
• आता त्यांच्या बंदुकीत शेवटची गोळीच उरली होती.
• चंद्रशेखर आझाद यांनी निश्चय केला होता की प्राण गेले तरी चालेल पण इंग्रजांच्या हाती लागायचे नाही.
• त्यांनी ती गोळी स्वतःला मारून घेतली आणि त्यांच्या इच्छेनुसार, शेवट्पर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही.
• चंद्रशेखर आझाद हे नावाप्रमाणेच कायम आझाद राहिले त्यांना जिवंत पणी कोणीच पकडू शकले नाही.
• 27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद नावाचा धगधगता ज्वलंत अग्नी अनंतात विलीन झाला.
