
चालू घडामोडी 27, फेब्रुवारी 2025 | भारताचा होंडुरासला मदतीचा हात | India dispatches Humanitarian Assistance to Honduras

भारताचा होंडुरासला मदतीचा हात
India's Aid to Honduras
Subject : GS - भूगोल - आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) उष्णकटिबंधीय वादळ साराच्या (SARA) पार्श्वभूमीवर भारताने होंडुरास (Honduras) या देशाला कोणत्या प्रकारची मदत दिली?
1. तांत्रिक कौशल्य
2. आर्थिक मदत
3. लष्करी मदत
4. मानवतावादी मदत
उत्तर : मानवतावादी मदत (Humanitarian Aid)
बातमी काय आहे ?
• अलिकडेच, उष्णकटिबंधीय वादळ साराच्या (SARA) पार्श्वभूमीवर भारताने होंडुरास (Honduras) या देशाला 26 टन मानवतावादी मदत (humanitarian aid) पाठवली आहे.
• परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मदतीमध्ये वैद्यकीय साहित्य आणि आपत्ती निवारण साहित्य समाविष्ट आहे, ज्यामध्ये शस्त्रक्रिया साहित्य, ग्लुकोमीटर, ऑक्सिमीटर, हातमोजे, सिरिंज, आयव्ही फ्लुइड्स, ब्लँकेट, स्लीपिंग मॅट्स आणि हायजीन किट यांचा समावेश आहे.
होंडुरास (Honduras) देश :
• होंडुरास (Honduras) हा मध्य अमेरिकन देश आहे ज्याच्या उत्तरेला कॅरिबियन समुद्र आणि दक्षिणेला पॅसिफिक महासागर आहे.
• होंडुरास या देशाची राजधानी 'तेगुसिगाल्पा' (Tegucigalpa) ही आहे.
उष्णकटिबंधीय वादळ सारा आणि त्याचा परिणाम :
• नोव्हेंबर 2024 मध्ये, होंडुरासच्या किनाऱ्यावर उष्णकटिबंधीय वादळ सारा निर्माण झाले.
• ज्यामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले.
• या चक्रीवादळामुळे होंडुरासमधील घरे आणि अनेक सार्वजनिक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या.
• वादळामुळे हजारो लोकांचे जीवन थेट प्रभावित झाले, मोठ्या संख्येने लोक त्यांच्या घरातून विस्थापित झाले.
• वादळामुळे स्वच्छ पाण्याची उपलब्धताही कठीण झाली आणि स्वच्छता व्यवस्था कोलमडली.
• ज्यामुळे 5 वर्षांखालील मुलांमध्ये अतिसार आणि पाण्याशी संबंधित आजारांचा धोका वाढला.
जागतिक आपत्ती निवारणात भारताची भूमिका :
• नैसर्गिक आपत्तींमध्ये भारत जागतिक स्तरावर मानवतावादी मदत पुरवत आहे.
• होंडुरासला पाठवलेली ही मदत भारताच्या "वसुधैव कुटुंबकम" धोरणाचे प्रतिबिंब आहे, ज्यामध्ये ते आपत्ती व्यवस्थापन आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देते.
चक्रीवादळ म्हणजे काय ? आणि ते कसे तयार होतात ?
• काही स्थानिक कारणांमुळे एकाएकी हवेच्या दाबात बदल होऊन मध्यभागी कमी दाबाचे केंद्र निर्माण होते आणि त्याच्या सभोवती हवेचा जास्त दाब होत जातो. यामुळे वारे चक्राकार गतीने कमी दाबाच्या केंद्राकडे वेगाने आकर्षिली जातात, त्याच आवर्त किंवा चक्रीवादळ असे म्हणतात.
• चक्रीवादळे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने (Anti-clockwise) फिरतात
• आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या दिशेने (Clockwise) फिरतात.
चक्रीवादळांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते ते पुढीलप्रमाणे :
• हिंदी महासागरातील वादळाला चक्रीवादळ (Cyclone) म्हटले जाते.
• वेस्ट इंडिज आणि अटलांटिकमधील वादळाला हरिकेन (Hurricane) नावाने ओळखले जाते
• पॅसिफिक महासागर व चिनी समुद्रातील वादळाला टायफून (Typhoon) या नावाने ओळखले जाते.
• ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील वादळाला विली-विली (Willy-Willy) या नावाने ओळखले जाते.