
चालू घडामोडी 26, फेब्रुवारी 2025 | राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार | National Dhanwantari Ayurveda Awards

राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार
National Dhanwantari Ayurveda Awards
Subject : GS - पुरस्कार, कला आणि संस्कृती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो ?
1. संरक्षण मंत्रालय
2. आयुष मंत्रालय
3. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
4. गृह मंत्रालय
उत्तर : आयुष मंत्रालय
बातमी काय आहे ?
• भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने 2025 सालचा प्रतिष्ठित राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार तीन डॉक्टरांना प्रदान केला.
• केंद्रीय आयुष राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणाला मिळाला ?
पारंपरिक भारतीय औषधशास्त्राच्या क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या तीन नामवंत आयुर्वेद व्यावसायिकांचा आयुष मंत्रालयाने प्रतिष्ठेचा “ राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार” देऊन सन्मान केला.
• वैद्य ताराचंद शर्मा : नामवंत नाडी वैद्य आणि लेखक
• वैद्य मायाराम उनियाल : द्रव्यगुण विज्ञानातील सुप्रसिद्ध विद्वान
• वैद्य समीर गोविंद जमदग्नी : विश्व व्याख्यानमाला राष्ट्रीय परिषदेचे संस्थापक

राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्काराचे स्वरुप :
• स्मृतिचिन्ह, भगवान धन्वंतरींची मूर्ती असलेली ट्रॉफी आणि 5 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो ?
राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणाला देण्यात येतो ?
• राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारांची गाथा परंपरा, उत्कृष्टता आणि दूरदृष्टीची आहे.
• राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारांराष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून देण्यात येतो.
• हा पुरस्कार, आयुर्वेदाला आपले जीवन समर्पित करणाऱ्या दिग्गजांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी देण्यात येतात.
आयुर्वेद म्हणजे काय ?
What is Ayurveda ?
• आयुर्वेद ही भारतातील प्राचीन औषधी संस्था आहे.
• आयुर्वेद, भारतातील एक स्वदेशी प्राचीन वैद्यकीय शास्त्र आहे जे 5000 वर्षांहून अधिक जुने आहे.
• आयुर्वेद हे अथर्ववेदाचा एक उपवेद मानले जाते.
• आयुर्वेद ही भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त औषध प्रणालींपैकी एक आहे.
• आयुर्वेद हा शब्द 'आयुः' आणि 'वेद' या दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे.
• आयुः चा अर्थ 'जीवन' आणि वेद शब्दाचा अर्थ 'विज्ञान' असा होतो.
• अशाप्रकारे, आयुर्वेद म्हणजे 'जीवनाचे विज्ञान' (Science of Life).
• ते शरीर, मन, आत्मा आणि पर्यावरण यांच्यातील संतुलनावर भर देते.
• आयुर्वेद आहार, औषधी वनस्पती, मालिश, योग, ध्यान आणि अंतर्गत शुद्धीकरण यासारख्या पद्धती वापरतो.
• यात नाडी, जीभ, डोळे आणि शारीरिक स्वरूप तपासण्यासारख्या तंत्रांचा वापर केला जातो.
आयुर्वेदाचे देवता भगवान धन्वंतरी :
• भारतीय पौराणिक श्रद्धेमध्ये भगवान धन्वंतरी यांना आरोग्य, औषध आणि आयुर्वेदाचे देव मानले जाते.
• भगवान धन्वंतरी हे रोगांचा नाश करणारे आणि आरोग्य देणारे देव विष्णूच्या अवतारांपैकी एक मानला जातो.
• आरोग्य देवता भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनावेळी अमृत कलश घेऊन अवतरले अशी पौराणिक कथा आहे.
राष्ट्रीय आयुर्वेद दिन केव्हा असतो ?
• भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणजे दिवाळी चा धनतेरस हा दिवस “राष्ट्रीय आयुर्वेद दिन” म्हणून साजरी केला जातो.