
चालू घडामोडी 26, फेब्रुवारी 2025 | पंतप्रधानांचे प्रधान सचिव- 2 कोण ? | Principal Secretary-2 to PM Narendra Modi

पंतप्रधानांचे प्रधान सचिव- 2 कोण ?
Principal Secretary-2 to PM Narendra Modi
Subject : GS - नियुक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच (फेब्रुवारी 2025) पंतप्रधानांचे प्रधान सचिव- 2 म्हणून खालील पैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
1. श्री उर्जित पटेल
2. श्री शक्तिकांत दास
3. श्री संजय मल्होत्रा
4. श्री रघुराम राजन
उत्तर : श्री शक्तिकांत दास
बातमी काय आहे ?
• रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर श्री शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव (Principal Secretary-2) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

प्रधान सचिव म्हणून श्री शक्तिकांत दास हे कोणती कामे बघतील ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रधान सचिव-1 पी. के. मिश्रा यांच्यासोबत ते प्रधान सचिव-2 म्हणून काम पाहतील.
• प्रधान सचिव पदावरील व्यक्तीस पंतप्रधान आणि फॉरेन डेलिगेट्समधील चर्चा करण्यासंदर्भात मुद्दे तयार करणं, विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये समन्वय निश्चित करणं, पंतप्रधानांसमोर महत्त्वाचे आदेश सादर करणं अशी कामं सोपवली जातात.
श्री शक्तिकांत दास यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्री शक्तिकांत दास हे मूळचे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथले रहिवासी आहेत.
• ते तामिळनाडू केडरचे 1980 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
श्री शक्तिकांत दास यांनी बजावलेल्या भूमिकांपैकी काही महत्त्वाच्या भूमिका :
• एनडीए सरकारच्या नेतृत्वाखाली अर्थ मंत्रालयात महसूल सचिव या पदावर ते कार्यरत होते.
• त्यांनी आर्थिक व्यवहार सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
• श्री शक्तिकांत दास हे 15व्या वित्त आयोगाचे सदस्य देखील होते.
• 2018 ते 2024 या कालावधीत श्री शक्तिकांत दास यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर म्हणून काम पाहिले.