
चालू घडामोडी 27, फेब्रुवारी 2025 | मराठी भाषा गौरव दिन | Marathi Bhasha Gaurav Din

मराठी भाषा गौरव दिन
Marathi Bhasha Gaurav Din
Subject : GS - दिनविशेष, कला आणि संस्कृती - साहित्य
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरी केला जातो ?
1. 21 फेब्रुवारी
2. 27 फेब्रुवारी
3. 1 मे
4. 3 ऑक्टोबर
उत्तर : 27 फेब्रुवारी
IMP नोट :
• 21 फेब्रुवारी : जागतिक मातृभाषा दिन
• 27 फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन
• 1 मे : मराठी राजभाषा दिन
• 3 ऑक्टोबर : मराठी अभिजात भाषा गौरव दिन (मराठी अभिजात भाषा दिवस)
मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला का साजरी करतात ?
• कविवर्य कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले.
• त्यांनी मराठी कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले.
• कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या बोलीभाषेला साहित्यप्रकार म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
• कविवर्य कुसुमाग्रज यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन यांमधील नेमका फरक काय ?
• कविवर्य कुसुमाग्रज यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
• तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य बनले.
• मराठी भाषेला महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली.
• म्हणून आपण 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन साजरी करतो.
• 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिन आणि मराठी राजभाषा दिन साजरी केला जातो.
कविवर्य कुसुमाग्रज यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
(जन्म : 27 फेब्रुवारी 1912 ; मृत्यू : 10 मार्च 1999)
• कुसुमाग्रजांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला.
• हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते.
• कुसुमाग्रजांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर हे आहे.
• कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती.
• एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणजेच कुसुमचा मोठा भाऊ म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले.
• त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले.
• वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज हे दुसरे साहित्यिक आहे.