
चालू घडामोडी 01, मार्च 2025 | SEBI चे नवे अध्यक्ष कोण ? | Who is the new chairman of the SEBI ?

SEBI चे नवे अध्यक्ष कोण ?
Who is the New Chairman of the SEBI ?
Subject : GS - नियुक्ती, वैधानिक संस्था
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाचे (SEBI) नवे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?
1. श्री तुहिन कांता पांडे
2. श्री संजय मल्होत्रा
3. श्री अनुराग गर्ग
4. श्री व्ही. रामसुब्रमण्यम
उत्तर : श्री तुहिन कांता पांडे (Tuhin Kanta Pandey)
बातमी काय आहे ?
• श्री तुहिन कांता पांडे यांनी 1 मार्च 2025 रोजी मुंबईत भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाचे (SEBI) अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
• श्री तुहिन कांता पांडे हे SEBI चे 11 वे अध्यक्ष बनले.
• भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ म्हणजेच Securities and Exchange Board of India (SEBI)

श्री तुहिन कांता पांडे यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• श्री तुहिन कांता पांडे हे 1987 च्या बॅचचे ओडिशा कॅडरचे IAS अधिकारी आहेत.
• त्यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्यापासून 3 वर्षांसाठी असणार आहे.
• श्री तुहिन कांता पांडे यांना अर्थ मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून व्यापक अनुभव आहे.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 12 एप्रिल 1988 रोजी भारत सरकारच्या ठरावाद्वारे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डची स्थापना एक गैर-वैधानिक संस्था (Non-Statutory Body) म्हणून करण्यात आली.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ला वैधानिक दर्जा केव्हा मिळाला ?
• पुढे 1992 मध्ये भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डची स्थापना एक वैधानिक संस्था (Statutory Body) म्हणून करण्यात आली.
• भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड कायदा, 1992 (Securities and Exchange Board of India Act, 1992 ) च्या तरतुदी 30 जानेवारी 1992 रोजी लागू झाल्या.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड चे मुख्यालय कोठे आहे ?
मुंबई येथे SEBI चे मुख्यालय आहे.
SEBI काय काम करते ?
SEBI चे उद्दिष्ट काय ?
• गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि भांडवली बाजार चालवण्यासाठी नियम बनवणे.
• शेअर बाजारामधील मध्यस्थ, दलाल, गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड, परकीय गुंतवणूकदार अशा सर्वांची नोंद करून, त्यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम SEBI करीत असते